नवी दिल्ली, 14 जुलै: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये 14 जुलैपासून सीएनजीसाठी (CNG Price hike) जास्त खर्च करावा लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने याबाबत मंगळवारी माहिती दिली आहे. यानंतर सीएनजीच्या किंमतीत प्रतिकिलो 2 रुपये 58 पैशांची वाढ झाली आहे तर घरगुती पाइपलाइन गॅची किंमत (Pipeline gas price hike) प्रति युनिट 55 पैशांनी वाढली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कंपनीने असा दावा केला आहे की या वाढीनंतरही सीएनजीचे दर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीपेक्षा कमीच राहणार आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.20 रुपये प्रति लीटर आहेत आणि डिझेलचे दर 97.29 रुपये प्रति लीटर आहेत.
काय आहेत नवे दर?
आज करण्यात आलेल्या वाढीनंतर एक किलो सीएनजीची किंमत 51.98 रुपये झाली आहे. तर पाइपलाइन गॅसची किंमत स्लॅब 1 साठी 30.40 रुपये प्रति यूनिट आणि स्लॅब 2 साठी 36 रुपये प्रति यूनिट असणार आहे. कंपनीकडूनच या नवीन दरांबाबत माहिती देण्यात आली आहे.
हे वाचा-आजपासून मालामाल होण्याची संधी, वाचा काय आहे या IPOमध्ये गुंतवणूक करण्याची संधी
पेट्रोल-डिझेलपेक्षा किती स्वस्त आहे सीएनजी?
पेट्रोल च्या तुलनेत सीएनजीच्या किंमती 67 टक्क्यांनी स्वस्त आहेत. आणि डिझेलच्या तुलनेत सीएजीचे दर 47 टक्क्यांनी कमी आहेत. घरगुती गॅस सिलेंडरपेक्षा सीएनजी पाइप गॅस 35 टक्के स्वस्त आहे.
काय आहेत गॅस सिलेंडरचे दर?
गॅस सिलेंडरच्या बाबतीत बोलायचे झाले तर या महिन्याच्या पहिल्या तारखेला 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. तर कमर्शिअल गॅसच्या अर्थात 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत 84 रुपयांची वाढ करण्यात आली होती. सध्या मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 834.50 रुपये आहे.
हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी, 100 रुपयांनी वधारलं सोनं
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
>> दिल्ली - पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 89.72 रुपये प्रति लीटर
>> मुंबई - पेट्रोल 107.20 रुपये आणि डिझेल 97.29 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई - पेट्रोल 101.92 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता - पेट्रोल 101.35 रुपये आणि डिझेल 92.81 रुपये प्रति लीटर
>> बंगळुरु - पेट्रोल 104.58 रुपये आणि डिझेल 95.09 रुपये प्रति लीटर
>> लखनऊ -पेट्रोल 98.29 रुपये आणि डिझेल 90.11 रुपये प्रति लीटर
>> पाटणा - पेट्रोल 103.52 रुपये आणि डिझेल 95.30 रुपये प्रति लीटर
>> भोपाळ - पेट्रोल 109.53 रुपये आणि डिझेल 98.50 रुपये प्रति लीटर
>> जयपूर - पेट्रोल 108.03 रुपये आणि डिझेल 98.85 रुपये प्रति लीटर
>> गुरुग्राम - पेट्रोल 98.83 रुपये आणि डिझेल 90.31 रुपये प्रति लीटर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.