• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • याठिकाणी पैसे गुंतवणारे झाले करोडपती! 1 लाखाच्या बदल्यात मिळाला 1 कोटींचा रिटर्न, तुमच्याकडेही आहे संधी

याठिकाणी पैसे गुंतवणारे झाले करोडपती! 1 लाखाच्या बदल्यात मिळाला 1 कोटींचा रिटर्न, तुमच्याकडेही आहे संधी

थोडा अभ्यास करून योग्य कंपनी निवडून शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास यातील जोखीम खूपच कमी होते. सध्याच्या काळात तर आर्थिक उत्पन्न घटल्यानं शेअर बाजारात गुंतवणूक करणं एक चांगला पर्याय आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 14 जुलै: शेअर्समध्ये (Shares) गुंतवणूक करणं अतिशय धोकादायक गुंतवणूक असल्याचा समज आहे, त्यामुळे अनेक लोकं शेअर्समध्ये गुंतवणूक करणं टाळतात. परंतु अल्पावधीत प्रचंड परतावा देणारा हाच एक पर्याय आहे. थोडा अभ्यास करून योग्य कंपनी निवडून गुंतवणूक केल्यास यातील जोखीम खूपच कमी होते. सध्याच्या काळात तर आर्थिक उत्पन्न घटल्यानं शेअर बाजारात गुंतवणूक करणं एक चांगला पर्याय आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर अनेक शेअर्स मल्टिबॅगर (Multibagger stocks) झालेले दिसून आले आहेत. विशेष म्हणजे या मल्टिबॅगर शेअर्समध्ये स्मॉल-कॅप (Small Cap) आणि मिड-कॅप (Mid Cap) शेअर्सची संख्या सर्वाधिक आहे. स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप म्हणजे छोट्या आणि मध्यम आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांचे शेअर्स. त्यामुळे या शेअरची किंमत इतर बड्या कंपन्यांच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे यातील गुंतवणूक कमी असते मात्र हे शेअर्स भरपूर फायदा करून देऊ शकतात. हे वाचा-CNG Price Hike: सामन्यांना मोठा झटका!CNG आणि घरगुती पाइपलाइन गॅसच्या किंमतीत वाढ चांगला नफा कमावण्यासाठी योग्य शेअरच्या निवडीबरोबर दीर्घकाळ गुंतवणूक ठेवणं ही महत्त्वाचं असतं. जे गुंतवणूकदार धीर धरून योग्य काळापर्यंत शेअर्स संग्रही ठेवून योग्य वेळी विकण्यावर विश्वास ठेवतात, त्यांना मोठा फायदा होतो. असे गुंतवणूकदार अशा काही मल्टिबॅगर शेअर्समुळे श्रीमंत झाले आहेत. मल्टिबॅगर दीपक नायट्रेट (Deepak Nitrite share price) अशा मल्टिबॅगर शेअरपैकी एक शेअर आहे दीपक नायट्रेटचा (Deepak Nitrite). या शेअरनं गेल्या दहा वर्षात तब्बल 10 हजार 413 टक्के परतावा दिला आहे. दीपक नायट्रेट ही रसायन निर्मिती क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आहे. तिच्या एका शेअरची किंमत 8 जुलै 2011 रोजी 18 रुपये 50 पैसे होती. 9 जुलै 2021 रोजी या शेअरची किंमत 1945 रुपये झाली आहे. गेल्या 10 वर्षात हा शेअर 105 पटीनं वाढला आहे. गुंतवणूकदार झाले मालामाल गेल्या दहा वर्षांत दीपक नायट्रेटच्या शेअरच्या किंमतीत झालेल्या वाढीवरून हे स्पष्ट होतं की, दहा वर्षांपूर्वी एखाद्यानं ‘Buy, Hold and Forget’ या रणनीतीनुसार या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे आज 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते. हे वाचा-आजपासून मालामाल होण्याची संधी, वाचा काय आहे या IPOमध्ये गुंतवणूक करण्याची संधी अजूनही गुंतवणूकीची संधी शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. 11 फेब्रुवारी 2021 रोजी या शेअरनं 1 हजारच्या पातळीवर ब्रेकआऊट दिल्यानंतर तो चांगलाच वाढला आहे. अजूनही चार्टवर या शेअरमध्ये सकारात्मक कल दिसत आहे. एक महिन्यासाठी 2040 आणि 2100 रुपयांचे उद्दिष्ट ठेवून हा शेअर खरेदी करण्यास हरकत नाही. त्यामुळं या शेअरमधून पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे अजूनही संधी आहे. (डिस्क्लेमर: बाजारातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन आहे. पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. https://lokmat.news18.com/वरून कोणालाही पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला जात नाही)
First published: