Home /News /money /

LIC ने लाँच केल्या 2 नवीन योजना, जाणून घ्या कशी कराल फायदेशीर गुंतवणूक

LIC ने लाँच केल्या 2 नवीन योजना, जाणून घ्या कशी कराल फायदेशीर गुंतवणूक

एलआयसीचे चेअरमन एमआर कुमार यांनी नुकतेच दोन नवीन यूनिट-लिंक्ड प्लॅन- एलआयसी निवेश प्लस प्लॅन (UIN 512L317V01) आणि एलआयसी SIIP (UIN 512L334V01) प्लॅन लाँच केले आहेत.

    मुंबई, 15 मार्च : तुम्ही जर पैशांची गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर LIC च्या पर्यायाकडे विशेष लक्ष दिलं जातं. LIC च्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भविष्याची तजवीज अनेकांकडून केली जाते. LIC देखील त्यांच्या ग्राहकांसाठी विविध योजना घेऊन येत आहे. LIC ची अशा योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाल अधिक फायदा मिळू शकतो. LIC SIIP या योजनेमध्ये गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं मानलं जात आहे. (हे वाचा- कोरोनाचं संकट वाढतंय!तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिक्लेम मिळणार?) एलआयसीचे चेअरमन एमआर कुमार यांनी नुकतेच दोन नवीन यूनिट-लिंक्ड प्लॅन- एलआयसी निवेश प्लस प्लॅन (UIN 512L317V01) आणि एलआयसी SIIP (UIN 512L334V01) प्लॅन लाँच केले आहेत. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 90 दिवस तर जास्तीत जास्त 65 वर्षे आहे. एलआसी निवेश प्लस -एलआयसी निवेश प्लस सिंगल प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि व्यक्तिगत जीवन विमा आहे, ज्यामध्ये पॉलिसी सुरु असताना विम्याबरोबरच गुंतवणुकीचा सुद्धा पर्याय मिळतो. -योजना घेणारा सिंगल प्रीमियम रक्कम निवडू शकतो. (हे वाचा-पेन्शनसाठी LIC ची खास योजना! एकदा गुंतवणूक केल्यानंतर दरमहा होणार भरभक्कम फायदा) -पॉलिसी घेणारा किती पैसे जमा करणार आहे, हे ठरवू शकतो -पॉलिसी घेताना त्याच्याकडे बेसिक सम अॅश्युअर्ड निवडण्याची सुविधा देखील आहे.- या दोन्ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी करू शकता. 02 मार्च 2020 पासून खरेदी करण्यासाठी ही योजना उपलब्ध आहे. एलआयसी SIIP -एलआयसी SIIP एक नियमित प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि व्यक्तिगत जीवन विमा आहे, ज्यामध्ये पॉलिसी सुरु असताना विम्याबरोबरच गुंतवणुकीचा सुद्धा पर्याय मिळतो. -पॉलिसी घेणारे त्यांना भरायची प्रीमियम रक्कम निवडू शकतात. - किमान प्रीमियम 40,000 रुपये (वार्षिक) तर जास्तीत जास्त प्रीमियमसाठी मर्यादा नाही-पॉलिसी पूर्ण झाल्यावर युनिट फंडाच्या मूल्याइतकी रक्कम दिली जाईल. पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या अटींनुसार त्यातून काही पैसेही काढता येतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या