नवी दिल्ली, 14 मार्च : LIC च्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भविष्याची तजवीज अनेकांकडून केली जाते. LIC देखील त्यांच्या ग्राहकांसाठी विविध योजना घेऊन येत आहे. LIC ची जीवन शांती योजना (Jeevan Shanti Scheme) देखील त्यामधून मिळणाऱ्या पेन्शनमुळे खास आहे. ही पॉलिसी ग्राहकांना पेन्शन (Pension)च्या माध्यमातून भविष्यासाठी सुरक्षा प्रदान करते. जर एखाद्या व्यक्तीने 50 वर्षांचा व्यक्ती 10,18,000 रुपये या पॉलिसीमध्ये गुंतवले तर त्याला वार्षिक पेन्शन 65,600 रुपये मिळतील. मात्र यासाठी काही अटी आणि नियमांचं पालन करावं लागेल. (हे वाचा- मोदी सरकारच्या निर्णयामुळे खिशाला चाप! पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढणार) ही योजना लाँच करताना LIC चे अध्यक्ष व्हिके शर्मा यांनी सांगितलं की जीवन शांती योजना एक नॉन लिंक्ड प्लान आहे. त्याचप्रमाणे ही प्रीमियम वार्षिक योजना आहे, ज्यामध्ये विमाधारकांना तात्काळ वार्षिक किंवा स्थगित वार्षिक हा पर्याय निवडता येईल. ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करा पॉलिसी ही योजना ऑफ़लाइन आणि ऑनलाइन पद्धतीने खरीदी करता येईल. एलआयसी जीवन शांती एक व्यापक वार्षिक योजना आहे, ज्या योजनेचा लाभ विमाधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होतो. जर 50 वर्षांच्या व्यक्तीने पॉलिसीमध्ये 10,18,000 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला त्वरित 65,600 वार्षिक पेन्शन मिळेल. परंतु डिफर्ड ऑप्शन अंतर्गत त्याला खालील रक्कम मिळेल: - 1 वर्षानंतर- वार्षिक 69,300 रुपये 5 वर्षांनंतर- वार्षिक 91,800 रुपये 10 वर्षांनंतर - वार्षिक 1,28,300 रुपये 15 वर्षांनंतर - वार्षिक 1,69,500 रुपये 20 वर्षांनंतर - वार्षिक 1,92,300 रुपये पॉलिसीचं महत्त्व LIC एजेंट राजेश कुमार त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही पॉलिसी सिंगल प्रीमियम डिपॉझिट पेन्शन प्लान आहे. या पॉलिसीमधील काही महत्त्वाचे मुद्दे - -कर्जाची सुविधा -महिन्यानंतर कोणत्याही मेडिकल डॉक्युमेंटशिवाय कधीही सरेंडर करू शकता -त्वरित किंवा 1 ते 20 वर्षांच्याद दरम्यान कधीही पेन्शन होईल सुरू (हे वाचा- SBI च्या 40 कोटी ग्राहकांना मोठा झटका! बचत खात्यावर मिळणारा व्याजदर घटवला ) -जॉइंट लाइफ पर्यायातून जवळच्या नातेवाईकाला या पॉलिसीत सहभागी करू शकता. -5 ते 20 वर्षांदरम्यान पेन्शन दर 9.18 टक्के ते 19.23 टक्के **-**आयकरामध्ये सूट या वयोगटातील नागरिक घेऊ शकतात फायदा एलआयसीची ही योजना किमान 30 वर्षे आणि जास्तीत जास्त 85 वर्षे घेतली जाऊ शकते. जीवन शांती योजनेत पेन्शन सुरू झाल्यानंतर 1 वर्षानंतर कर्ज दिले जाऊ शकते. या योजनेमध्ये कमीत कमी गुंतवणीक दीड लाखाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.