जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लेकीच्या लग्नाचं टेंशन घेत असाल तर डोंट वरी! ही स्किम देतेय लाखो रुपये

लेकीच्या लग्नाचं टेंशन घेत असाल तर डोंट वरी! ही स्किम देतेय लाखो रुपये

आता धुमधडाक्यात करता येईल लेकीचं लग्न,  121 रुपये जमा करा आणि व्हा टेंशन फ्री!

आता धुमधडाक्यात करता येईल लेकीचं लग्न, 121 रुपये जमा करा आणि व्हा टेंशन फ्री!

ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या अनेक योजना एलआयसीने सुरु केल्या आहेत. अशीत एक पॉलिसी म्हणजे कन्यादान योजना. यामध्ये तुम्हाला दररोज किंवा महिन्याला काही रुपये जमा करावे लागतील आणि पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला मोठी रक्कम दिली जाईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी गुंतवणूक करू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 फेब्रुवारी: LIC हे भारतातील विश्वासाचे नाव आहे. याच्या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला गॅरंटीसह परतावा देण्याचे वचन देते. एलआयसी विविध वयोगट आणि गरजांनुसार पॉलिसी आणते. अशीच एक पॉलिसी म्हणजे LIC कन्यादान योजना. या योजनेचे असंख्य फायदे आहेत. तुमच्या मुलीच्या लग्नात किंवा तिच्या उच्च शिक्षणात पैशांची कमतरता भासू नये हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही दररोज 121 रुपये (महिन्यात 3600 रुपयांपेक्षा थोडे जास्त) जमा केल्यास, तुमची मुलगी 25 वर्षांची झाल्यावर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही रक्कम वाढवू शकता आणि त्याच आधारावर तुमचा फंडही वाढेल. आम्ही येथे 25 वर्षांच्या योजनेबद्दल बोललो आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही योजना कमीही करू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्ही 13 ते 25 वर्षांच्या दरम्यान कितीही वर्षांची योजना घेऊ शकता. तुम्हाला टर्मपेक्षा 3 वर्षे कमी कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 25 वर्षांसाठी योजना घेतली तर तुम्हाला फक्त 22 वर्षांसाठी पैसे द्यावे लागतील. तुम्ही दररोज, दर महिन्याला, दर 4 महिन्यांनी किंवा दर 6 महिन्यांनी प्रीमियम भरू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडू शकता.

‘या’ LIC पॉलिसीची देशभरात धूम! 15 दिवसात 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी केली खरेदी

एलआयसी कन्यादान योजनेत गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे

-दररोज 121 रुपये जमा केल्याने, 25 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. (उच्च गुंतवणुकीवर रक्कम वाढेल) तुम्हाला पेमेंट टर्मपेक्षा तीन वर्षे कमी करावे लागेल. -पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमा ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, आर्थिक मदत त्वरित उपलब्ध होईल. -नैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये आणि अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. -पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबाला दरवर्षी डेथ बेनिफिट दिले जातील. -LIC कडून दरवर्षी दिले जाणारे बोनस देखील या प्लॅनमध्ये उपलब्ध असतील. -या योजनेत 3 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यानंतर कर्जही घेता येते. -ही पॉलिसी पूर्णपणे करमुक्त आहे. (वार्षिक 1.50 लाख रुपये प्रीमियमवर कमाल सूट) -मुलीच्या लग्नानंतरही एलआयसी तिच्या आयुष्यासाठी दरवर्षी काही रक्कम देईल.

फक्त 150 रुपयांत सुधारेल मुलांचे भविष्य, LIC च्या या योजनेत आजच करा गुंतवणूक

हे आहेत पात्र

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. तसेच, वडिलांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असू नये. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रपोजल फॉर्म आणि मुलीच्या जन्माचा दाखला देखील विचारला जाईल. तसेच, पहिला हप्ता रोख किंवा चेकने भरला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात