नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जीवन आझाद पॉलिसीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. LIC ने लॉन्च झाल्यानंतर 10-15 दिवसांत 50,000 जीवन आझाद पॉलिसी विकल्या आहेत. एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी व्हर्च्युअल प्रेस मीटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. जीवन आझाद पॉलिसी ही नॉन पार्टिसिपेटिंग विमा योजना आहे. एलआयसीने जानेवारी 2023 मध्ये ती लॉन्च केली. एलआयसी सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवते. देशातील लाखो लोकांनी एलआयसीच्या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे.
हमखास मिळेल परतावा
जीवन आझाद योजनेत प्रीमियम भरण्याची मुदत माइनस 8 वर्षे आहे. उदाहरणार्थ, जर एखादा गुंतवणूकदार 18 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी निवडतो, तर व्यक्तीला फक्त 10 वर्षांसाठी (18-8) प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसी मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम देण्याची हमी देते. या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 2 लाख रुपये आणि कमाल विमा रक्कम 5 लाख रुपये आहे. ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांसाठी घेतली जाऊ शकते.
ATM मधून कॅश काढताना ‘या’ लाइटकडे ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाउंट!ही पॉलिसी कोण घेऊ शकते?
समजा 30 वर्षांची व्यक्ती 18 वर्षांसाठी जीवन आझाद योजना घेते. ते 2 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी 10 वर्षांत 12,038 रुपये जमा करतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, ‘बेसिक सम एश्योर्ड’ किंवा पॉलिसी घेताना निवडलेल्या वार्षिक प्रीमियमच्या 7 पट नॉमिनीला दिले जातील. तसेच, यासाठी अट अशी आहे की, मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेले एकूण प्रीमियम 105 टक्क्यांपेक्षा कमी नसावेत. 90 दिवस वयाचे बाळ ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. एलआयसीची ही योजना घेणारा पॉलिसीधारक वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकतो. पॉलिसीधारकांना मॅच्योरिटी पूर्ण झाल्यावर गॅरंटीड परतावा मिळतो.
फक्त 150 रुपयांत सुधारेल मुलांचे भविष्य, LIC च्या या योजनेत आजच करा गुंतवणूकLIC चा नफा
एमआर कुमार म्हणाले की, एलआयसी नॉन पार्टिसिपेटिंग विम्यासारख्या हमी योजनांवर लक्ष केंद्रित करतेय. कारण ते पॉलिसीधारकांना उच्च मार्जिन देतात. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत LIC च्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ झाली आहे. एलआयसीने डिसेंबर तिमाहीत नफ्यात 6,334 कोटी रुपयांची मोठी वाढ नोंदवली आहे. वर्षभरापूर्वीच्या कालावधीत ते 235 कोटी रुपये होते. LIC चे निव्वळ प्रीमियम उत्पन्न देखील 2022 आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत रु. 97,620 कोटींच्या तुलनेत 2023 आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत मध्ये 1.1 लाख कोटी रुपये झाले.