मुंबई, 9 जुलै : गुंतवणुकीचा (Investments) विचार आला की बरेचसे पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मात्र सर्वात सुरक्षित आणि चांगल्या परताव्याबाबत विचार केला तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं (LIC) नाव समोर येतं. LIC मध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्या गरजेनुसार अनेक स्कीम्स आहेत. त्यामुळे तुमचा गुंतवणुकीचा उद्देश यावरून तुम्ही एलआयसीची कोणतीही योजना (LIC Schemes) निवडू शकता. एलआयसीच्या जीवन लक्ष्य (LIC Jeevan Lakshya) भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या पॉलिसीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, एलआयसीकडून दरवर्षी नॉमिनीला एक निश्चित रक्कम दिली जाते. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर मॅच्युरिटी बेनिफिट देखील मिळतो. पॉलिसीला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज देखील उपलब्ध आहे. या पॉलिसीसाठी प्रीमियम भरल्यावर 80C अंतर्गत कपातीचा लाभ उपलब्ध आहे. कलम 10D अंतर्गत मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे. SBI नं बंद केली अनेक बँक खाती, तुम्ही लगेच करा चेक… अन्यथा बसेल फटका एलआयसीच्या जीवन लक्ष्य या योजनेत दररोज 125 रुपये जमा तर 27 लाख रुपये जमा करु शकता. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे, परंतु तुम्हाला फक्त 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. या योजनेसाठी पॉलिसीची मुदत 13 ते 25 वर्षे आहे. किमान विमा रक्कम 1 लाख असू शकते. जर एखाद्याने वयाच्या 30 व्या वर्षी 10 लाखांची विमा रक्कम घेतली तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला सुमारे 3800 रुपये जमा करावे लागतील. दरमहा 3800 रुपये जमा केल्यावर 25 वर्षांनंतर तुम्हाला 27 लाख रुपये मिळतील. Aadhar Card नंबर वापरून करा पेमेंट, स्मार्ट फोनचीही आवश्यकता नाही, खूपच सोपी आहे पद्धत! पॉलिसी सुरु असताना मध्येच जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबाला कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही. तसेच पॉलिसीच्या उर्वरित वर्षांमध्ये मुलीला दरवर्षी विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम मिळेल. या योजनेची पॉलिसी मुदत 13-25 वर्षे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.