जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI नं बंद केली अनेक बँक खाती, तुम्ही लगेच करा चेक...अन्यथा बसेल फटका

SBI नं बंद केली अनेक बँक खाती, तुम्ही लगेच करा चेक...अन्यथा बसेल फटका

SBI नं बंद केली अनेक बँक खाती, तुम्ही लगेच करा चेक...अन्यथा बसेल फटका

महिन्याचा पहिल्या आठवडा हा पगार होण्याचा असतो, तसंच बरेच पैशांचे व्यवहारदेखील याच आठवड्यात करायचे असतात. नेमकं अशावेळी बँकेने खाती बंद केल्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

    मुंबई, 8 जुलै :  बँकेत खातं असणाऱ्या सर्वांनी वेळोवेळी आपले केवायसी अपडेट (Bank KYC Update) करणं गरजेचं असतं. असं न केल्यास बँक व्यवहार करण्यावर निर्बंध लागू होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अनेक ग्राहकांची खाती याच कारणामुळे बंद (SBI accounts freeze) केली आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना धक्का बसलाय. महिन्याचा पहिल्या आठवडा हा पगार होण्याचा असतो, तसंच बरेच पैशांचे व्यवहारदेखील याच आठवड्यात करायचे असतात. नेमकं अशावेळी बँकेने खाती बंद केल्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  बँकेने किमान याबाबत पूर्वसूचना द्यायला हवी होती असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर, केवायसी अपडेट (SBI KYC update) केल्यानंतर लगेच खात्यातून व्यवहार सुरू होतील, असं स्पष्टीकरण बँकेनं दिलंय. ‘TV9 हिंदी’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर तक्रार केवायसी अपडेट न केल्यामुळे एसबीआयने ग्राहकांची खाती फ्रीज (SBI accounts) केली आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्या खात्यातून कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. याबद्दल ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.  “माझे मनी ट्रान्सफर बॅन करण्यात आले आहेत. याचे कारण केवायसी नॉन कम्प्लायन्स. केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेने किमान फोन किंवा मेल करुन सांगायला हवं. मात्र एसबीआयने थेट खातंच बंद केलं आहे. मी एनआरआय आहे, कृपया केवायसी अपडेट करण्यासाठी माझी मदत करा.” असं ट्विट एका ग्राहकाने केलं आहे. आणखी काही ग्राहकांनीदेखील अशाच प्रकारच्या तक्रारींचे ट्विट केले आहेत. एसबीआयचं उत्तर स्टेट बँकेने याबाबत बोलताना हे स्पष्ट केलं, की ग्राहकांना वेळोवेळी केवायसी अपडेट (SBI KYC) करण्याबाबत माहिती दिली गेली होती. खाती बंद करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. ट्विटरवरदेखील तक्रारींना उत्तर देताना एसबीआय ग्राहकांना केवायसी (Know Your Customer) अपडेट करण्यास सांगत आहे. जवळच्या एसबीआय शाखेत जाऊन तुम्ही केवायसी अपडेट करू शकता, ज्यानंतर तुमच्या खात्यातील व्यवहार सुरू होतील; असं बँकेने म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सनुसार, ग्राहकांनी वेळोवेळी केवायसी करणं गरजेचं असतं. या ग्राहकांना कित्येक माध्यमातून माहिती दिली जाते. ग्राहकांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर याबाबत एसएमएसदेखील केला जातो, असं एसबीआयने स्पष्ट केलं आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राहक जेव्हा एसबीआयच्या केवायसी अपडेट सेक्शनमध्ये (SBI KYC update online) जातात, तेव्हा त्यांना कोणत्याही सूचना वा अलर्ट मिळत नाहीत. यामुळे त्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. Aadhar Card नंबर वापरून करा पेमेंट, स्मार्ट फोनचीही आवश्यकता नाही, खूपच सोपी आहे पद्धत! असं करा केवायसी अपडेट एसबीआय आपल्या ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी केवायसी अपडेट (How to update SBI KYC) करण्याची सुविधा देते. ऑफलाईन अपडेट करण्यासाठी ग्राहकांना जवळच्या ब्रँचमध्ये जाऊन कागदपत्रं जमा करावी लागतात. तर ऑनलाईन पद्धतीने अपडेट करताना ग्राहकांना आपल्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवरून बँक शाखेच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर कागदपत्रांची स्कॅन्ड कॉपी पाठवावी लागते. बँक या कागदपत्रांची तपासणी करून केवायसी अपडेट करते. ऑनलाईन केवायसी अपडेट करण्यासाठी त्याच कागदपत्रांची कॉपी पाठवणं गरजेचं आहे, जी तुम्ही आधी बँकेकडे जमा केली होती. जर कागदपत्रांमध्ये काही बदल झाले असल्यास, बँकेच्या शाखेत जाऊनच केवायसी अपडेट करता येईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात