जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Aadhar Card नंबर वापरून करा पेमेंट, स्मार्ट फोनचीही आवश्यकता नाही, खूपच सोपी आहे पद्धत!

Aadhar Card नंबर वापरून करा पेमेंट, स्मार्ट फोनचीही आवश्यकता नाही, खूपच सोपी आहे पद्धत!

Aadhar Card नंबर वापरून करा पेमेंट, स्मार्ट फोनचीही आवश्यकता नाही, खूपच सोपी आहे पद्धत!

स्मार्टफोन किंवा कंप्यूटर न वापरणाऱ्यांसाठी डिजिटल व्यवहार (Digital Transaction) ही आजवर कठीण गोष्ट होती. मात्र सरकारच्या UIDAI नं यावर आता तोडगा काढला आहे. भीम (BHIM) अ‍ॅपवरून आधारकार्ड क्रमांक वापरून आता डिजिटल व्यवहार करता येऊ शकतील.

    मुंबई, 8 जुलै : स्मार्टफोन किंवा कंप्यूटर न वापरणाऱ्यांसाठी डिजिटल व्यवहार (Digital Transaction) ही आजवर कठीण गोष्ट होती. मात्र सरकारच्या UIDAI नं यावर आता तोडगा काढला आहे. भीम (BHIM) अ‍ॅपवरून आधारकार्ड क्रमांक वापरून आता डिजिटल व्यवहार करता येऊ शकतील. केंद्रातील मोदी सरकारने देशात डिजिटल युग सुरु केलं. एकमेकांच्या संपर्कात न येता UPI अ‍ॅप वापरून कोणताही व्यवहार करणं शक्य झालं. अनेक व्यापारी आता याच माध्यमातून व्यवहार करतात. मात्र अजूनही देशातील अनेक नागरिक डिजिटल व्यवहार करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी आता UIDAI नं आधारकार्डाच्या (Aadhaar Card) माध्यमातून डिजिटल व्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता भीम अ‍ॅप वापरून आधारकार्ड नंबरच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येतात. भीम (BHIM) ही UPI वर आधारित पेमेंट सिस्टिम आहे. यात फोन नंबर किंवा नाव या एकाच ओळखीचा वापर करून रिअल टाइम फंड ट्रान्सफर (Real Time Fund Transfer) करता येतं. या व्यवहारासाठी व्यक्तीकडे स्मार्टफोन असलाच पाहिजे अशी गरज नाही ती साध्या फोनवरूनही ही सुविधा वापरू शकते. UIDAI नुसार, भीम अ‍ॅपमध्ये आधार क्रमांकाचा वापर करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यासाठी लाभार्थ्याचा 12 आकडी आधार क्रमांक त्यात टाकावा लागतो. या क्रमांकाचा वापर करून पैसे पाठवण्यासाठी व्हेरिफिकेशन बटण दाबावं लागतं. त्यानंतर सिस्टिममध्ये आधार क्रमांक योग्य असल्याची पडताळणी केली जाते आणि लाभार्थ्याच्या पत्त्याची चाचपणी होते. यानंतर पैसे पाठवता येऊ शकतात. डीबीटी / आधार क्रमांकावर आधारित पैसे जमा करून घेण्यासाठी UIDAI नं निवड केलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे पाठवले (Money Transfer) जातात. आधारवरून पीओएसचा उपयोग करून पेमेंट स्वीकारणाऱ्या किरकोळ विक्रेत्याला आधार क्रमांक किंवा हाताच्या ठशाचा वापर करता येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीची एकापेक्षा अधिक बँकेत खाती असतील व ती सगळीच आधारकार्डाला जोडलेली असतील, तर या सगळ्या खात्यांचा उपयोग डिजिटल पेमेंटसाठी करता येऊ शकतो. आधारकार्डचा वापर करून व्यवहार करताना तुमच्या बँकेची निवड करण्याचा पर्याय दिला जातो. म्हणजेच प्रत्येकवेळी व्यवहार करताना तुम्हाला हव्या त्या बँकेतून पेमेंट करता येऊ शकतं. जेव्हा आधारवरून पैसे दिले जातात, तेव्हा खात्यातून पैसे लगेचच कमी होतात. डिजिटल व्यवहार ज्यांना करता येत नाहीत, त्यांच्यासाठी आधार क्रमांकावरून पैसे पाठवणं आता शक्य झालं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात