दिल्ली, 28 एप्रिल: गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार LIC IPO ची वाट पाहत आहे. देशातला आजवरचा सर्वांत मोठा IPO (Biggest IPO of India) म्हणून यात गुंतवणुकीची मोठी संधी असल्यानं हा IPO मार्केटमध्ये कधी येतोय, याची वाट गुंतवणूकदार पाहत होते. परंतु आता मे महिन्यात हा आयपीओ मार्केटमध्ये येणार असल्याचं स्पष्ट झालंय.
सरकारी विमा कंपनी LIC चा IPO 4 मे रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) उघडणार आहे आणि 9 मे पर्यंत बोली लावण्यासाठी खुला असेल. LIC च्या या मेगा IPO साठी 902 रुपये ते 949 रुपये किंमतीचा प्राईस बँड (LIC IPO Price Band) निश्चित करण्यात आला आहे. या IPO मध्ये, एका लॉटमध्ये (LIC IPO Lot) 15 शेअर्स असतील.
LIC IPO मध्ये किती डिस्काउंट?
कंपनीच्या बोर्डाने LIC IPO मध्ये कर्मचाऱ्यांसाठी 45 रुपये आणि LIC च्या पॉलिसीधारकांसाठी 60 रुपये डिस्काउंट निश्चित केलाय.
LIC IPO बद्दल आली महत्त्वाची माहिती; 4 मेपासून खुला होणार IPO, किती असेल किंमत वाचा..
अँकर इन्व्हेस्टर्ससाठी LIC IPO फक्त 2 मे रोजी उघडेल. तर, LIC IPO चं शेअर बाजारात लिस्टिंग 17 मे रोजी होणार आहे. बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने या आयपीओचा आकार कमी केलाय. आता सरकार LIC मधील 3.5 टक्के स्टेक कमी करणार आहे. या IPO च्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा विचार आहे. आकार कमी केल्यानंतरही हा भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा IPO (Biggest IPO of Indian History) असणार आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.
मुलांच्या पॉलिसीचा लाभ मिळणार का?
मुलांच्या नावावर पॉलिसी असेल तर आयपीओवरील डिस्काउंट लाभ कोणाला मिळणार, असा प्रश्नही लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. एलआयसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नोत्तरामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, अल्पवयीन मुलांच्या पॉलिसीच्या (Minor Kids Policy) बाबतीत प्रपोजर हा हा पॉलिसीचा मालक मानला जातो. त्यामुळे मुलांची पॉलिसी ज्यांनी प्रपोज केली आहे, ते पॉलिसीधारक आहेत. त्यानुसार ते पॉलिसीवरील डिस्काउंट आणि रिझर्वेशनचा लाभ घेऊ शकतात.
जॉईंट पॉलिसीचा लाभ कोणाला मिळणार?
दरम्यान, पती आणि पत्नीची जॉईंट पॉलिसी (Joint Policy) असेल तर त्याच्या रिझर्वेशनचा लाभ दोघांनाही मिळणार की एकाला मिळणार, असा एक प्रश्न उपस्थित होत आहे. तर, जॉईंट पॉलिसीमध्ये दोन पॉलिसीधारकांपैकी फक्त एकच रिझर्वेशन पोर्शनसाठी (Policyholder Reservation Portion) अर्ज करू शकतो. दुसरा पार्टनर नॉर्मल रिटेल कॅटेगरीसाठी (Normal Retail Category) अर्ज करू शकतात. दोघांपैकी जो रिझर्वेशन पोर्शनसाठी अर्ज करेल, त्याला सर्व सवलतींचा लाभ मिळेल.
लॅप्स पॉलिसीवर मिळणार डिस्काउंट
जर, तुमच्याकडील एखादी एलआयसी पॉलिसी कोणत्याही कारणाने लॅप्स झाली असेल, तरीही तुम्ही IPO मध्ये डिस्काउंट मिळवू शकता. एलआयसीने आयपीओ संदर्भात FAQ मध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात पॉलिसी लॅप्स झाल्यानंतरही आयपीओसाठी अर्ज करता येईल, असे सांगण्यात आले आहे. जर पॉलिसी मॅच्युअर झाली नसेल किंवा ती सरेंडर केली नसेल किंवा विमाधारकाचा मृत्यू झाला नसेल, तर पॉलिसीधारकाला रिझर्वेशन आणि डिस्काउंटचा लाभ मिळेल.
ग्रुप एलआयसी पॉलिसीवर लाभ मिळणार नाही
तुमच्याकडे LIC ची ग्रुप पॉलिसी (LIC Group Policy) असल्यास, तुम्ही या IPO मध्ये रिझर्वेशन किंवा डिस्काउंटचा लाभ घेऊ शकत नाही. ग्रुप पॉलिसीचे पॉलिसीधारक या IPO मध्ये रिझर्वेशनसाठी पात्र असणार नाहीत, असं एलआयसीने स्पष्ट केलंय. म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या कंपनीकडून LIC ची ग्रुप पॉलिसी मिळाली असेल, तर तुम्ही या पॉलिसीच्या आधारे कोणताही लाभ घेऊ शकत नाही.
‘या’ पॉलिसीधारकांनाही नाही मिळणार कोणताही लाभ
देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट (Discount) आणि रिझर्वेशनचा (Reservation) लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकांकडे भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) असणं आवश्यक आहे, असं एलआयसीने स्पष्ट केलंय.
हे वाचा - 'हा' आहे अस्सल Multibagger Stock; एका वर्षात दिला तब्बल 1100 टक्के परतावा
FAQ नुसार, जे पॉलिसीधारक अनिवासी भारतीय (NRI) आहेत किंवा भारतात राहत नाहीत त्यांना IPO मध्ये रिझर्वेशन आणि इतर सवलतीचा लाभ मिळणार नाही. याशिवाय एलआयसीचे इतर सर्व पॉलिसीधारक विशेष डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात.
LIC IPO खास का आहे?
देशातील सर्वांत मोठ्या विमा कंपनीचा आयपीओ अनेक अर्थांनी खास असणार आहे. यासाठी गुंतवणूकदार दीर्घकाळ वाट पाहत आहेत.
लिस्टिंगनंतर देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये एलआयसीचा समावेश होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) सध्या देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे, तर टीसीएस (TCS) दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, विलीनीकरणानंतर एचडीएफसी (HDFC) बँकही मोठ्या कंपन्यांच्या पंक्तीत येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC, Share market