जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC IPO : एलआयसीकडे 21,500 कोटी अनक्लेम रक्कम पडून, DRHP मध्ये माहिती उघड

LIC IPO : एलआयसीकडे 21,500 कोटी अनक्लेम रक्कम पडून, DRHP मध्ये माहिती उघड

LIC IPO : एलआयसीकडे 21,500 कोटी अनक्लेम रक्कम पडून, DRHP मध्ये माहिती उघड

ड्राफ्टच्या प्रॉस्पेक्टसनुसार, एलआयसीकडे मार्च 2021 अखेरीस 18,495 कोटी रुपये आणि मार्च 2020 अखेरीस 16,052.65 कोटी रुपयांचा अनक्लेम निधी होता. त्याच वेळी, मार्च 2019 अखेरीस एकूण अनक्लेम निधी 13,843.70 कोटी रुपये होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या IPO साठी फाईल ड्राफ्ट प्रॉस्पेक्टसमध्ये दिसून आलं की एलआयसीकडे सप्टेंबर 2021 पर्यंत 21,539 कोटी रुपयांचा अनक्लेम फंड पडून आहे. एलआयसीने अलीकडेच बाजार नियामक सेबीकडे एक ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला होता, ज्यामध्ये सरकारने ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे कंपनीतील आपला 5 टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव दिला आहे. मार्चपर्यंत अनक्लेम रक्कम 18,495 कोटी रुपये होती ड्राफ्टच्या प्रॉस्पेक्टसनुसार, एलआयसीकडे मार्च 2021 अखेरीस 18,495 कोटी रुपये आणि मार्च 2020 अखेरीस 16,052.65 कोटी रुपयांचा अनक्लेम निधी होता. त्याच वेळी, मार्च 2019 अखेरीस एकूण अनक्लेम निधी 13,843.70 कोटी रुपये होता. अनक्लेम निधीमध्ये त्या पैशावर मिळणारे व्याज देखील समाविष्ट असते. Paytm कडून मिळतंय विना गॅरंटी 5 लाखांचं झटपट लोन, काय करावं लागले? तुमची रक्कम कशी तपासायची? पॉलिसीधारक एलआयसीच्या वेबसाइटवरील लिंकवर जाऊन दावा न केलेली आणि थकित रक्कम (जी सहामाही अपडेट केली जाते) तपासू शकतात. ही माहिती मिळवण्यासाठी त्यांना एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्डचा तपशील भरावा लागेल. विमा कंपन्यांना 1,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची माहिती द्यावी लागते प्रत्येक विमा कंपनीने त्यांच्या संबंधित वेबसाइटवर 1,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा अनक्लेम रकमेची माहिती डिस्प्ले करणे आवश्यक आहे. ही वेबसाइट पॉलिसीधारकांना किंवा लाभार्थ्यांना थकीत रकमेची पडताळणी करण्याची सुविधा देखील प्रदान करते. भारतीय विमा नियामक प्राधिकरण (IRDAI) च्या हक्क न केलेल्या रकमेचे परिपत्रक अनक्लेम रकमेची देयके, पॉलिसीधारकांना माहिती, अकाऊंटिंग, गुंतवणुकीच्या रकमेचा वापर इत्यादीची प्रक्रिया ठरवते. विमान प्रवास महागण्याची शक्यता, Aviation Turbine Fuel चे दर पुन्हा वाढले SCWF नियमांअंतर्गत व्यवहार अनक्लेम रकमेच्या परिपत्रकानुसार, 10 वर्षांहून अधिक काळ पॉलिसीधारकांचा अनक्लेम कॉर्पस SCWF नियमांनुसार हाताळला जातो. सर्व विमा कंपन्यांनी SCWF ला अनक्लेम रकमा ट्रान्सफर करण्यासाठी अर्थ विभागाने आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयाने निर्धारित केलेल्या लेखा प्रक्रियेचे पालन केले पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: investment , LIC , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात