जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Paytm कडून मिळतंय विना गॅरंटी 5 लाखांचं झटपट लोन, काय करावं लागले?

Paytm कडून मिळतंय विना गॅरंटी 5 लाखांचं झटपट लोन, काय करावं लागले?

Paytm

Paytm

पेटीएमच्या या कर्ज सेवेमध्ये पूर्णपणे डिजिटल कर्ज अर्ज प्रक्रियेसह, कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. कर्जाची परतफेड प्रामुख्याने पेटीएमसह व्यापाऱ्याच्या डेली सेटलमेंटद्वारे केली जाते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : व्यवसाय म्हटलं की पैशाची गरज नेहमी असते. त्यात जर तुम्ही छोटे व्यापारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. Paytm ने छोट्या व्यापाऱ्यांसाठी 5,00,000 पर्यंत कर्ज देण्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही. शिवाय, ते फेडण्यासाठी, पेटीएमने डेली EMI पर्याय देखील दिला आहे. Paytm ने या संदर्भात शेड्युल कमर्शियल बँका आणि NBFC सोबत भागीदारी केली आहे. तुम्हाला हे कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला पेटीएम फॉर बिझनेस अॅपमधील (Patm For Business) ‘मर्चंट लेंडिंग प्रोग्राम’मध्ये (Merchant Lending Program) जावे लागेल. पेटीएमचे अल्गोरिदम तुमच्या किंवा व्यापाऱ्याच्या दैनंदिन व्यवहारांच्या आधारे क्रेडिट-योग्यता तपासेल. Multibagger Share : एका महिन्यात ‘या’ शेअरमध्ये 300 टक्के वाढ, 10 लाख बनले 40 लाख! पेटीएमच्या या कर्ज सेवेमध्ये पूर्णपणे डिजिटल कर्ज अर्ज प्रक्रियेसह, कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. कर्जाची परतफेड प्रामुख्याने पेटीएमसह व्यापाऱ्याच्या डेली सेटलमेंटद्वारे केली जाते. जर तुम्ही एकाच वेळी वेळेपूर्वी कर्ज भरायचे ठरवले तर यासाठी कोणतेही प्री-पेमेंट शुल्क (Pre-Payment Fees) नाही. LIC IPO : तुम्हीही एलआयसी आयपीओची वाट पाहताय? काय असेल इश्यू प्राईज? वाचा डिटेल्स कर्जासाठी या स्टेप्स फॉलो करा » Paytm for Business अॅपच्या होम स्क्रीनवरील ‘Business Loan’ आयकॉनवर टॅप करा आणि तुमच्यासाठी उपलब्ध ऑफर तपासा. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता. » एकदा तुम्ही रक्कम निवडल्यानंतर, तुम्ही कर्जाची रक्कम, वितरित केलेली रक्कम, एकूण देय (Total Payable), दैनिक हप्ता (Daily Installment), कार्यकाल (Tenure) इत्यादी तपशील पाहू शकता. » आता तुम्हाला तुमच्या तपशीलांची पुष्टी करावी लागेल. चेक बॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जाण्यासाठी ‘Get Started’ वर टॅप करा. तुमचा कर्जाचा अर्ज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे KYC तपशील CKYC कडून मिळवण्यास संमती देऊ शकता. » पुढील स्क्रीनवर, तुम्ही तुमचा पॅन कार्ड डेटा, जन्मतारीख आणि ई-मेल पत्ता यासारख्या तपशीलांची पडताळणी करू शकता. जर हे भरले नाहीत तर ते भरा आणि पुष्टी करा. एकदा हे पूर्ण झाल्यावर तुम्ही ऑफरच्या पुष्टीकरणासह पुढे जाऊ शकता. पॅन तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, तुमचा क्रेडिट स्कोअर पडताळला जाईल आणि केवायसीची पडताळणी केली जाईल. » तुमचा कर्ज अर्ज (Loan Application) सबमिट केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा. Paytm ने त्यांच्या Q3 FY22 च्या अहवालात नोंदवले होते की या प्लॅटफॉर्मवर वितरित केलेल्या व्यापारी कर्जांची संख्या वार्षिक 38 टक्क्यांनी वाढली आहे, तर व्यापारी कर्जाचे मूल्य वार्षिक 128 टक्क्यांनी वाढले आहे. नवीन कर्जदारांना 25 टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज वितरित केले गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: loan , money , Paytm
  • First Published :
जाहिरात
जाहिरात