मुंबई, 16 फेब्रुवारी : पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंवर होतो. यानंतर आता विमानाने प्रवास (Air Travel) करणे देखील आता महाग होऊ शकते. कारण आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) वाढ झाल्यामुळे बुधवारी एटीएफ (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल- Aviation Turbine Fuel) च्या किमती 5.2 टक्क्यांनी वाढल्या, त्यानंतर देशातील एटीएफच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. पेट्रोल-डिझेलचे दर 103 दिवसांनंतरही स्थिर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एटीएफच्या किमतीत झालेली ही चौथी वाढ आहे, परंतु वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग 103 व्या दिवशी स्थिर आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात नसल्याचे मानले जात आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. Paytm, Zomato ची अवस्था पाहून अनेक कंपन्यांची घबराट, ‘या’ कंपन्यांनी IPO योजना पुढे ढकलली दिल्लीत ATF ची किंमत 4,481.63 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचली सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एटीएफची किंमत 4,481.63 रुपये प्रति किलो किंवा 5.2 टक्क्यांनी वाढून 90,519.79 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. Zomato, Paytm, Nykaa शेअर ऑलटाईम लो लेव्हलवर; तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी काय करावं एटीएफच्या किमती विक्रमी पातळीवर एटीएफची किंमत वाढल्याने आता ती सर्वोच्च पातळी आहे. ATF ची किंमत ऑगस्ट 2008 मध्ये प्रति किलोलिटर रुपये 71,028.26 होती, जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 147 डॉलरवर पोहोचली होती. मंगळवारी ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 93.87 डॉलरवर होती. जेट इंधनाच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला सुधारित केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात, परंतु 4 नोव्हेंबर 2021 पासून वाहनांच्या इंधनाच्या किमती बदललेल्या नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांनी कपात केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.