• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • तुमचा क्रेडिट स्कोअर 700 पेक्षा जास्त असेल तर LIC लोनवर देईल खास सवलत, अशाप्रकारे तपासा स्कोअर

तुमचा क्रेडिट स्कोअर 700 पेक्षा जास्त असेल तर LIC लोनवर देईल खास सवलत, अशाप्रकारे तपासा स्कोअर

तुमचा CIBIL Score 700 पेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. LIC Housing finance ने होम लोन घेणाऱ्या नव्या ग्राहकांसाठी व्याजदरात कपात करून दर 6.90 टक्के केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: तुमचा सिबिल स्कोअर जर (CIBIL Score) 700 पेक्षा जास्त आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. LIC Housing finance कमी व्याजदरात गृहकर्ज (Home loan) देत आहेत. LIC Housing finance ने होम लोन घेणाऱ्या नव्या ग्राहकांसाठी व्याजदरात कपात करून दर 6.90 टक्के केला आहे. गृहकर्जावर ही आतापर्यंतचे सर्वात कमी व्याज आहे. ज्या ग्राहकांचा CIBIL स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना या दराने गृहकर्ज मिळेल. ग्राहकाचा CIBIL स्कोअर त्याने आधी कोणतेही कर्ज घेतले आहे की नाही यावर अवलंबून आहे. जर त्याने ते घेतले असेल तर त्याने ते वेळेवर भरले आहे की नाही यावर हा स्कोअर अवलंबून आहे. CIBIL स्कोअर तपासताना अशा काही इतर पैलू देखील लक्षात घेतल्या जातात. काय आहे कर्जाची मर्यादा? एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या मते,  CIBIL स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.90 टक्क्यांपासून सुरू होईल. एवढाच स्कोअर असल्यास 80 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांसाठी 7 टक्के व्याज दर असेल. हे वाचा-SBI ग्राहकांसाठी सूचना, बँक सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर पूर्ण करा हे काम कशाप्रकारे तपासाल सिबिल क्रेडिट स्कोअर? सिबिलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचाा क्रेडिट स्कोअर मोफत तपासू शकता >> सिबिलच्या https://www.cibil.com/ या वेबसाइटला भेट द्या आणि पेजवर असणाऱ्या गेट युअर सिबिल स्कोअर यावर क्लिक करा >> यानंतर तुम्ही सब्सक्रिप्शन ऑप्शनच्या पेजवर जाल, फ्री ऑप्शनसाठी स्क्रोल डाऊन करावं लागेल >> त्यानंतर अकाउंट क्रिएट करा आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर 'एक्सेप्ट अँड कंटिन्यू'वर क्लिक करा >> या स्टेपनंतर तुम्हाला ओळख व्हेरिफाय करावी लागेल >>डॅशबोर्डवर जा तुम्हाला तुमच्या नावनोंदणीची पुष्टी करणाऱ्या  एका नवीन विंडोवर नेले जाईल. >> यासंदर्भात तुम्हाला मेल देखील पाठवला जाईल. तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी गो टू डॅशबोर्डवर क्लिक करा
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: