Home /News /money /

तुम्ही देखील LIC Policy खरेदी करणार असाल तर सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे

तुम्ही देखील LIC Policy खरेदी करणार असाल तर सावधान! अन्यथा बुडतील सर्व पैसे

तुम्ही देखील LIC Policy खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सावधानता बाळगूनच ही पॉलिसी खरेदी करा. कारण कोरोनाकाळात (Coronavirus) फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत.

    नवी दिल्ली, 25 मे: एलआयसी खातेधारकांसाठी आणि नवीन एलआयसी पॉलिसी (LIC Policy) काढू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर LIC पॉलिसी काढली असेल तर किंवा काढणार असाल तर सावधान!  कारण कोरोनाकाळात (Coronavirus) फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. बँक ग्राहकांच्या फसवणुकीच्या घटना नेहमी समोर येतात, आता LIC ग्राहकांना देखील लक्ष्य केलं जात आहे. हे फसवणूक करणारे भामटे एलआयसी अधिकारी किंवा IRDAI अधिकारी बनून ग्राहकांना फोन करतात आणि त्याचं खातं रिकामं करतात. ही प्रकरणं पाहता देशातील सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीने (LIC-Life Insurance Corporation of India) ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. काही भामटे LIC अधिकारी, एजंट (Fake LIC Agent or officer) किंवा विमा नियामक आयआरडीएचे अधिकारी बनतात आणि ग्राहकांना कॉल करतात. यांच्या जाळ्यात अडकल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. एलआयसीने जारी केलेल्या अलर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कंपनी कोणतीही पॉलिसी सरेंडर करण्याबाबत ग्राहकांना सूचवत नाही. कंपनीने ग्राहकांना या अशाप्रकारच्या नंबरवरून आलेले फोन अटेंड न करण्याचे आवाहन केले नाही. एलआयसीने ग्राहकांना सूचित केले आहे की त्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांची पॉलिसी रजिस्टर करावी आणि त्याठिकाणी सर्व माहिती घ्यावी. हे वाचा-झटका! कोरोना काळात सातत्याने वाढतायंत इंधनाचे दर, पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल LIC ने केलं ट्वीट LIC ने ट्वीट करत अशी माहिती दिली आहे की, ग्राहकांनी अशा फोन कॉल्सबाबत सावध राहणं आवश्यक आहे जे पॉलिसीची चुकीची माहिती देऊन ग्राहकांना फसवतात. गेल्या काही दिवसांपासून पॉलिसीची रक्कम त्वरित मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाली आहे. हे लक्षात ठेवा - तुम्हाला जर पॉलिसीसंदर्भात कोणती माहिती हवी असेल तर एलआयसीची अधिकृत वेबसाइट www.licindia.in ला भेट द्या आणि माहिती मिळवा. कोणत्याही क्रमांकावर फोन करून पॉलिसीसंदर्भात माहिती मिळवू नका -बनावट कॉल आल्यास तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता, शिवाय spuriouscalls@licindia.com यावर देखील तुमची तक्रार नोंदवू शकता. -अशाच एजंटकडून पॉलिसी खरेदी करा ज्याच्याकडे आयआरडीए द्वारे जारी करण्यात आलेला परवाना आहे किंवा एलआयसीने दिलेले ओळखपत्र (ID) आहे हे वाचा-Gold Price Today: खूशखबर! सोन्याचांदीची झळाळी उतरली, वाचा काय आहे आजचा भाव -जर तुम्हाला कोणताही दिशाभूल करणारा कॉल आला तर  co_crm_fb@licindia यावर इमेल करून तक्रार करू शकता. -एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा पर्याय ग्राहकांकडे आहे. -तुमची वैयक्तिक आणि पॉलिसीसंदर्भातील माहिती इतर कुणाकडेही शेअर करू नका -पॉलिसी सरेंडर करण्यासंदर्भातही कुणाला माहिती देऊ नका.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Financial fraud, Insurance, LIC, Money fraud

    पुढील बातम्या