Home /News /money /

मोठा झटका! कोरोना काळात सातत्याने वाढतायंत इंधनाचे दर, पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल

मोठा झटका! कोरोना काळात सातत्याने वाढतायंत इंधनाचे दर, पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल

Petrol Diesel Price Today: एकीकडे कोरोनाची समस्या आणि दुसरीकडे इंधनाचे वाढते दर सामान्यांचं कंबरडं मोडणारे ठरत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

    नवी दिल्ली, 25 मे: सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात  (Petrol Diesel Price Today) वाढ केली आहे. सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे सामान्यांच्या चिंतेत आणखी वाढ होत आहे. आज पेट्रोलच्या दरात 23 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलही जवळपास याच दराने वाढलं आहे. रविवारी पेट्रोलचे दर 15 ते 17 पैसे दर डिझेलचे दर 25 ते 29 पैशांनी महागले होते. महानगरातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price on 25th May 2021) >> दिल्लीमध्ये पेट्रोल 93.44 रुपये आणि डिझेल 84.32 रुपये प्रति लीटर >> मुंबईमध्ये पेट्रोल 99.71 रुपये आणि डिझेल 91.57 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 95.06 रुपये आणि डिझेल 89.11 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 93.49 रुपये आणि डिझेल 87.16 रुपये प्रति लीटर >> नोएडामध्ये पेट्रोल 91.11 रुपये आणि डिझेल 84.79 रुपये प्रति लीटर (हे वाचा-या बँकांच्या विलिनीकरणाबाबत RBIकडून गाइडलाइन्स जारी, तुमच्यावर काय होणार परिणाम) >> हैदराबादमध्ये पेट्रोल 97.12 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये प्रति लीटर >> पाटणामध्ये पेट्रोल 95.62 रुपये आणि डिझेल 89.58 रुपये प्रति लीटर >> जयपूरमध्ये पेट्रोल 99.92 रुपये आणि डिझेल 93.05रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 101.52 रुपये आणि डिझेल 92.77 रुपये प्रति लीटर >> लखनऊमध्ये में पेट्रोल 91.03 रुपये आणि डिझेल 84.71 रुपये प्रति लीटर >> रांचीमध्ये पेट्रोल 90.23 रुपये आणि डिझेल 89.05 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. (हे वाचा-Gold Price Today: सोने दर 48 हजारांवर, तर चांदीही महागली; वाचा आजचा लेटेस्ट रेट) रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या