नवी दिल्ली, 20 जानेवारी : सोनं-चांदीला मागणी कमी झाल्याने सोनं-चांदीच्या दरात (Gold-Silver Prices)थोडी वाढ झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 4 रुपयांनी वाढलेत तर एक किलो चांदीचे दर 7 रुपयांनी वाढले. HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या नुसार सुस्त ट्रेंड आल्याने सोन्याच्या भावात थोडी तेजी आलीय. सोन्याचे नवे दर (Gold Prices on 20 January) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 40 हजार 744 रुपयांवरून 40 हजार 784 रुपयांवर गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 560 डॉलर प्रतिऔंस तर चांदीचे भाव 18.05 डॉलर प्रतिऔंस झाले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही थोडी वाढ झाली. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचे भाव 47 हजार 856 रुपयांवरून 47 हजार 863 रुपये प्रतिकिलो झाले. HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्यानुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोर सुरुवात झाली. सोनं असली आहे की नकली ? 1. सोन्याचे दागिने खरेदी करताना BIS हॉलमार्क नक्की तपासा. BIS हॉलमार्कवरून ते सोनं शुद्ध आहे की नाही हे कळू शकतं. BIS हॉलमार्कची खूण प्रत्येक दागिन्यावर असते आणि त्याचबरोबर एक त्रिकोणाची खूणही असते. (हेही वाचा : आधार कार्ड हरवलं तर कुठेही जाण्याची नाही गरज, UIDAI ने सुरू केली नवी सेवा) 2. सोन्याच्या दागिन्याला एका पिन टोचून हलकंसं खरवडा. त्यावर नायट्रिक अॅसिड टाका. सोनं असली असेल तर त्याचा रंग बदलणार नाही. जर सोनं नकली असेल तर ते लगेचच हिरवं होईल. 3. खऱ्या सोन्याची पारख चुंबकानेही करता येते. एक स्ट्राँग चुंबक घेऊन ते सोन्याजवळ ठेवा. सोनं त्याकडे आकर्षित झालं तर ते सोनं शुद्ध नाही. सोनं जर चुंबकाकडे आकर्षित झालं नाही तर ते सोनं खरं नाही. 4. सोन्याची चाचणी पाण्यानेही करता येते. सोनं बादलीभर पाण्यात बुडवा. जर ते डुबलं तर ते सोनं असली आहे आणि जर डुबलं नाही तर नकली आहे. ===================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.