नवी दिल्ली, 13 जून : देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी एलआयसी ग्राहकांसाठी बचत आणि सुरक्षितता दोन्ही लाभ देणाऱ्या अनेक योजना ऑफर करते. LIC ची आधारस्तंभ ही अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करून हे दोन्ही फायदे मिळतात. या योजनेत फक्त पुरुष अर्जदारच गुंतवणूक करू शकतात. यासाठी आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. आधारस्तंभ पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठी कोणत्या अटी आहेत, पात्रतेचे निकष काय असतात, तसेच पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर कोणते लाभ मिळतात, या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. ‘डीएनए’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
एलआयसी आधारस्तंभ पॉलिसी ही एक पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड इंडिव्हिज्युअल जीवन विमा बचत योजना आहे. ही संरक्षण आणि बचत असे दुहेरी फायदे देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देण्यासोबतच विमाधारकाने पॉलिसीची मुदत पूर्ण केल्यास मॅच्युरिटी बेनिफिटही दिले जाते, ज्यामुळे भविष्यासाठी पैसे उभारण्यास मदत होते.
LIC Policy : ‘या’ पॉलिसीमध्ये महिन्याला करा 833 रुपयांची गुंतवणूक, मिळतील कोट्यवधी!एलआयसी आधारस्तंभ पॉलिसी: पात्रता आणि वैशिष्ट्ये
- ही एलआयसी पॉलिसी घेण्याचं किमान वय 8 वर्षे आणि कमाल 55 वर्षे आहे. - हे लोन सुविधेसह ऑटो कव्हर सुविधा आणि कॅश फ्लो आवश्यकता प्रदान करते. - ही एक एंडॉवमेंट योजना आहे, ज्यात पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर एकरकमी पैसे दिले जातात. -मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसीधारकाला मूळ विमा रक्कम आणि लॉयल्टी अॅडिशन मिळते. -पॉलिसीच्या 3 वर्षानंतरच कर्जाची सुविधा मिळते. -ही योजना फक्त पुरुषांसाठी उपलब्ध आहे. - किमान सम अॅश्युअर्ड: 75,000 रुपये - कमाल सम अॅश्युअर्ड: 3,00,000 रुपये - तुम्ही प्रीमिअम दरमहा, त्रैमासिक, सहा महिने किंवा वार्षिक पद्धतीने भरू शकता. -तुम्ही या योजनेत 10 वर्षे ते 20 वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. - विम्याच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला सर्व फायदे मिळतील. - या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
LIC Schemes: एलआयसीच्या ‘या’ योजनांनी रिटायरमेंट होईल टेन्शन फ्री! जाणून घ्या पूर्ण डिटेल्सआधारस्तंभ पॉलिसी समजून घ्या
समजा, पॉलिसीधारकाने 15 वर्षांच्या मुदतीसाठी प्रतिवर्ष 10,000 रुपये गुंतवणूक करायचं ठरवलं तर पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर पॉलिसीधारकाला 2,00,000 रुपयांची विमा रक्कम व लॉयल्टी अॅडिशन मिळेल. विम्याच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला सर्व फायदे मिळतील. आपण पुरुष असाल तर या योजनेत गुंतवणूक करू शकता.