Home /News /money /

रेकॉर्ड ब्रेकिंग घसरणीनंतर सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठे बदल, वाचा काय आहेत बुधवारचे दर

रेकॉर्ड ब्रेकिंग घसरणीनंतर सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठे बदल, वाचा काय आहेत बुधवारचे दर

सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold rates today) मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    नवी दिल्ली, 20 मे : सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold rates today) मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याच्या किंमती प्रति तोळा 47356 रुपयांवर पोहोचल्या आहेत. याआधी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. सोन्याचे दर जवळपास 48000 प्रति तोळावरून 46966 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. चांदीच्या किंमतीही पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये चांदी प्रति किलो 1515 रुपयांनी महागली आहे. 10 दिवसांत सोन्याच्या किंमतीत झाले मोठे बदल गेल्या 10 व्यवहारिक दिवसांमध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा 45743 रुपयांवरून 48000 रुपयांपर्यंत पोहोचली होती. मंगळवारी हजारापेक्षा अधिक रुपयांनी सोन्याच्या किंमती घसरून 46966 प्रति तोळा झाल्या होत्या. 5 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 45743 प्रति तोळा इतक्या होत्या, 8 मे रोजी सोन्याचे दर 46221 रुपये प्रति तोळा इतके होते. 14 मेपासून सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढल्या. (हे वाचा-लॉकडाऊनच्या संकटात या महिन्यापासून मिळणार जास्त पगार, सरकारचा नवीन नियम लागू) 14 मे रोजी सोन्याचे भाव 46246 रुपये प्रति तोळावर होते, पुढच्या दिवशी नवीन इतिहास रचत सोने प्रति तोळा 46791 रुपये झाले तर 18 मे रोजी सोने आतापर्यंतच्या सर्वात जास्त किंमतीवर म्हणजेच प्रति तोळा 47948  रुपयांवर जाऊन पोहोचले. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्यामध्ये कमालीची घसरण झाली. काल सोन्याचे भाव प्रति तोळा 46966 रुपये होते. तर आज यामध्ये 527 रुपयांची वाढ होत दर 47365 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. सोन्याच्या वायदे बाजारात तेजी कशामुळे? मागणी वाढल्यामुळे बुधवारी वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांनी वाढ होत सोनं 47,270 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये जुनसाठी सोन्याच्या किंमती 220 रुपयांनी अर्थात 0.47 टक्क्यांनी वाढून 47,470 रुपये प्रति तोळा झाल्या आहेत. ऑगस्टच्या सोन्याच्या किंमतीत 197 रुपयांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती 1,753 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार 'ऑनलाइन दुकान') संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Silver

    पुढील बातम्या