मुंबई : SBI आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आणत असते. SBI ने Whatspp वरही अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आता बँकेतील गर्दी टाळण्यासाठी बरीच कामं ऑनलाईन केली जातात. SBI ने बँकेच्या ग्राहकांच्या फेऱ्या आणि वेळ दोन्ही वाचवला आहे.
2/ 5
SBI ने कस्टमर केअर नंबर जारी केला आहे. 1800 1234 किंवा 1800 2100 या क्रमांकावर तुम्हाला फोन केल्यावर काही सेवा उपलब्ध होणार आहेत.
3/ 5
बँक खात्याचा नंबर आणि तुमचे शेवटचे 5 ट्रान्झॅक्शनची माहिती तुम्हाला मिळू शकते. याशिवाय तुमच्या ATM कार्डचं स्टेटस देखील तुम्हाला जाणून घेता येईल.
4/ 5
तुम्ही जर चेकबुक मागवलं असेल तर तुम्हाला ते मिळालं नाही तर त्याचं स्टेटस चेक करू शकता. टीडीएस डिटेल्स आणि ATM कार्डसाठी रिक्वेस्ट किंवा ब्लॉक करण्याची प्रक्रिया देखील या नंबरवर फोन करून तुम्ही करू शकता.
5/ 5
ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. बऱ्याचदा ग्राहक गुगलवरुन नंबर काढतात आणि त्यानंतर फसवणुकीचे शिकार होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी बँकेनं ग्राहकांना आवाहन केलं आहे.