मुंबई : बँकांनी एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने काढूनही घेतलं अशी तऱ्हा सध्या सुरू आहे. एकीकडे FD वर व्याजदर वाढवत आहेत, तर दुसरीकडे MCLR देखील वाढत असल्याने लोन आणि EMI वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांचं टेन्शन वाढलं आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यापासून खासगी आणि सरकारी बँकाही त्यांचे व्याजदर वाढवत आहेत. आता खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेनेही व्याजदर वाढवलं आहे. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार नवीन दर 16 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. एका वर्षापासून वेगवेगळ्या कालावधीची कर्जे आहेत त्या सगळ्यांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटनुसार, मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) 10 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
पुढचे 2 दिवस बँक बंद आजच करा काम, ATM मध्येही खडखडाट?बँकेची बहुतांश कर्जे या MCLR शी जोडलेली असतात. गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचा समावेश आहे. बँकेने आता MCLR 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के केला आहे. नवीन दर 16 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँक प्रत्येक महिन्याला MCLR मध्ये बदल करत असते. त्यामुळे हे दर कमी जास्त होत राहतात. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार यावेळी बँकेनं तीन वर्षांपर्यंतचा बदल केला आहे. आता सुधारित दर 7.80 टक्क्यांवरून 9.05 टक्के झाला आहे. याआधी ऑक्टोबरच्या मध्यातही बँकेने आपला MCLR वाढवला होता. त्यानंतर तो 7.70 ते 8.95 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. SBI चे व्याजदर वाढवल्यानंतर कोटक बँकेने आपला MCLR वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने विविध मुदतीच्या कर्जावर MCLR 15 बेस पॉईंटने वाढवला आहे. SBI ने आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळातील MCLR 8.05 टक्के केला आहे, जो पूर्वी 7.95 टक्के होता.
SBIचा ग्राहकांना मोठा झटका, EMI आणि लोन आजपासून महागवाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली. आता पुन्हा डिझेंबर महिन्यात वाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. RBI ने मे महिन्यात रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ केली होती, त्यानंतर प्रत्येक आर्थिक आढावा बैठकीत व्याजदर वाढवले जात आहेत.
आतापर्यंत रेपो रेटमध्ये एकूण 1.90 टक्के वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, बँकांनी बाह्य बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जाचे व्याजदरही त्याच प्रमाणात वाढवले आहेत, तर MCLR सारख्या अंतर्गत बेंचमार्कचे व्याजदर हळूहळू वाढवले जात आहेत.