जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पुढचे 2 दिवस बँक बंद आजच करा काम, ATM मध्येही खडखडाट?

पुढचे 2 दिवस बँक बंद आजच करा काम, ATM मध्येही खडखडाट?

पुढचे 2 दिवस बँक बंद आजच करा काम, ATM मध्येही खडखडाट?

बँक कर्मचारी संपावर गेल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुमची काही महत्त्वाची बँके ची कामं असतील तर ती लगेच पूर्ण करून घ्या. यावेळी तिसऱ्या शनिवारी बँक बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवार सलग बँक बंद असल्याने ATM सेवेवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे काढून ठेवायचे असतील तर आजच हे काम पूर्ण करा. बँकेशी निगडीत तुमची कामं आज आणि उद्यामध्ये पूर्ण करा. 19 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचा परिणाम आता ATM सुविधेवर होणार आहे. त्यामुळे अनेक कामं रखडली जाण्याची शक्यता आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर पेन्शनसाठी कागदपत्र जमा करायची असतील तर ती आज उद्यामध्ये पूर्ण करा.

जनधन खातं उघडताच मिळणार दीड लाख रुपयांचा फायदा, काय आहे स्कीम

बँक कर्मचारी संपावर गेल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने दिली आहे. सगळ्या बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. मात्र आता संपामुळे 19 नोव्हेंबरला बँका तिसऱ्या शनिवारी संपावर जाणार आहेत. यावेळी ऑनलाइन व्यवहार सुरू राहतील. छोटे पेमेंट NEFT सेवा सुरू राहणार आहे. मात्र चेक किंवा इतर महत्त्वाची कामं जी बँकेतच जाऊन करावी लागतात ती मात्र करता येणार नाहीत.

एक नंबर! बँकेतील FD वर मिळतायत 5 जबरदस्त सुविधा, कसा घ्यायचा फायदा
News18लोकमत
News18लोकमत

रविवारी सुट्टी आहे, त्यानंतर चौथा शनिवार रविवार असल्याने पुढच्या आठवड्यात सुट्टी आणि महिना अखेर असल्याने बँकेत भरपूर काम असेल तर तुमचं काम पेंडिग राहू शकतं. त्यामुळे तुमच्याकडे आजचे दोन दिवस आणि पुढच्या आठवड्यातलेही 5 दिवस असणार आहेत. ATM मधूनही आज उद्यामध्ये जास्तीचे पैसे काढून ठेवा. नाहीतर आयत्यावेळी गडबड होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात