मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBIचा ग्राहकांना मोठा झटका, EMI आणि लोन आजपासून महाग

SBIचा ग्राहकांना मोठा झटका, EMI आणि लोन आजपासून महाग

या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे, यामुळे कर्ज महागणार आहे.

या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे, यामुळे कर्ज महागणार आहे.

या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे, यामुळे कर्ज महागणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आधीच महागाई आणि ऑक्टोबर महिन्यात लोन आणि EMI वाढल्यानंतर आता परत सरकारी बँक SBI ने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. वाढत्या महागाईत पुन्हा एकदा लोन आणि EMI चे दर वाढवले आहेत. तब्बल 15 बेसिस पॉईंटने MCLR वाढवल्याने लोन आणि EMI साठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लँडिंग रेट (MCLR) वाढवण्याची घोषणा केली. बँकेने MCLR च्या दरात 15 बेसिस पॉइंटची वाढ केल. ही वाढ सर्व कालावधीसाठी करण्यात आली आहे.

या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे, यामुळे कर्ज महागणार आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार एमसीएलआरच्या दरात झालेली वाढ 15 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे. या वाढीनंतर, रात्रभर एमसीएलआरचे दर 7.60% राहिले आहेत. बेंचमार्क एक वर्षाचा एमसीएलआर 10 बेसिस पॉईंट्सने वाढवून 8.05% पर्यंत वाढविण्यात आला आहे, जो आधी 7.95% होता.

Aurangabad : लग्नसराईची खरेदी सुरू, पाहा कोणत्या दागिन्याची आहे क्रेझ, Video

MCLR वाढल्याने कसा होणार परिणाम

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज या सगळ्या किंमती एक वर्षाच्या एमएसएलआर दरावर आधारित असतात. MCLR वाढल्याने आता व्याजदरातही वाढ होणार आहे. एसबीआयने एक नोटीस जारी केली आहे.

2 आणि 3 वर्षांचा एमएसएलआर (8.15% आणि 8.25%) 10 बेसिस पॉईंटवरून अनुक्रमे 8.25% आणि 8.35% पर्यंत वाढवण्यात आला आहे. एमएसएलआर दर वाढवल्यास त्यावर आधारित असलेल्या तुमच्या गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोनसह सर्व कर्जांचा ईएमआय वाढेल.

तुम्ही करताय का या चुका? होऊ शकतं मोठं नुकसान 

या वाढीनंतर, एक महिना आणि तीन महिन्यांचा एमएसएलआर 15 बेसिस पॉईंट्सने 7.60% वरून 7.75% पर्यंत वाढविण्यात आला आहे. 6 महिन्यांचा एमएसएलआर 15 बेसिस पॉईंट्सने वाढून 8.05% झाला आहे.

MCLR काय आहे?

एमसीएलआर किंवा फंड-आधारित लँडिंग रेटची सीमांत किंमत हा किमान दर आहे ज्यावर बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते. एमसीएलआर दरातील ही वाढ किंवा सुधारणा याचा थेट परिणाम कर्जाच्या किंमतीवर होणार आहे.

कर्जावरील व्याजदर वाढल्यास तुमचा ईएमआय आपोआप वाढेल, जोपर्यंत बँकेने कर्जावरील आपले मार्क-अप/मार्जिन कमी केले नाही. त्यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता एमएसएलआरशी संलग्न कर्जासाठी ईएमआय भरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi ATM, SBI bank, SBI Bank News