मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमचीही आहेत एकापेक्षा जास्त बँक खाती तर होईल मोठं नुकसान, टाळण्यासाठी करा हे काम

तुमचीही आहेत एकापेक्षा जास्त बँक खाती तर होईल मोठं नुकसान, टाळण्यासाठी करा हे काम

एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. वाचा हे टाळण्यासाठी काय उपाय करता येईल

एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. वाचा हे टाळण्यासाठी काय उपाय करता येईल

एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. वाचा हे टाळण्यासाठी काय उपाय करता येईल

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती (Bank Accounts in More than one Bank) उघडली असतील तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकापेक्षा जास्त खाती (Bank Account) असल्यानं ग्राहकांना काही अडचणींना तोंड द्यावे लागते तसेच त्यांचा आर्थिक तोटाही होतो. जितकी जास्त खाती असतील तितकी जोखीम जास्त असल्यानं फसवणुकीची शक्यता देखील अधिक असते. शिवाय ही खाती सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला मिनिमम बॅलन्स (Minimum Balance) देखील त्या खात्यामध्ये ठेवावा लागेल. असे न केल्यास बँक तुमच्याकडून भरभक्कम शुल्क देखील वसूल करुन घेऊ शकते.

वापर होत नसल्यास एकापेक्षा जास्त खाती बंद करणं हा चांगला पर्याय

-सध्याच्या काळात अनेकजण लवकर लवकर नोकऱ्या बदलतात आणि अशावेळी त्यांची कंपनी त्यांच्या पद्धतीने नवीन सॅलरी बँक अकाउंट उघडते. त्यामुळे बऱ्याचदा आधीच्या कंपनीने काढलेले खाते निष्क्रिय होऊन जाते. कोणत्याही खात्यामध्ये 3 महिन्यापर्यंत सॅलरी न आल्यासे ते आपोआप बचत खात्यामध्ये बदलते.

-ते खाते बचत खात्यामध्ये बदलल्यानंतर त्याचे नियम देखील बदलतात. अशावेळी खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स असणे देखील गरजेचे होऊन जाते. अन्यथा बँकेकडून दंड वसुलला जाऊ शकतो. मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्यासाठी तुम्हाला वारंवार पेनल्टी भरावी लागली तर तुमचा सिबिल स्कोअर देखील खराब होतो. शिवाय मेंटेनन्स शुल्कही भरावे लागते.

हे वाचा-'या' कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यात वाढीव DA सह येणार एक्स्ट्रा पगार

-जास्त बँक खाती असल्यास आयकर भरताना देखील तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

-त्याचप्रमाणे सर्व बँकांचे स्टेटमेंट ठेवणे अतिरिक्त काम होऊ शकते. निष्क्रिय खात्याचा ठीक वापर न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. दोन वर्षात कोणतंही ट्रान्झॅक्शन न झाल्यास ते खातं डॉरमेंट अकाउंट (Dormant Account) मध्ये बदलतं. अशावेळी फसवणुकीच्या घटना वाढताता. बँकर्सच्या मते अशा खात्यात इंटर्नल आणि एक्सटर्नल फ्रॉडच्या शक्यता अधिक असतात. निष्क्रिय खाते (Inactive Account) न वापरल्यास तुम्हाला नुकसानच सहन करावं लागेल.

-समजा तुमच्याकडे 4 बँक खाती आहेत ज्यामध्ये मिनिमम बॅलेन्स 10000 रुपये आवश्यक आहे. तुम्हाला 4 टक्के व्याजदराच्या हिशोबाने यावर 1600 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही ही खाती बंद करून हेच पैसे म्युच्यूअल फंड किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवल्यास जवळपास 10 टक्के अधिक फायदा तुम्हाला मिळेल.

नुकसान टाळण्यासाठी काय कराल?

-तुम्ही अशी खाती बंद करू शकता. त्याकरता अकाउंट क्लोजर फॉर्म भरावा लागेल

-खाते बंद करताना तुम्हाला डी-लिंकिंग खाते फॉर्म भरावं लागेल. बँकेच्या शाखेमध्ये अकाउंट क्लोजर फॉर्म उपलब्ध असतो.

हे वाचा-PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून होणार बचत खात्यावरील व्याजदरात बदल

-तुम्हाला खाते बंद करण्यासाठी त्याचे कारण सांगावे लागेल. जर तुमचे जॉइंट खाते असेल तर सर्व खातेधारकांचे हस्ताक्षर आवश्यक आहे.

-तुम्हाला आणखी एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात त्या खात्याची माहिती द्यावी लागेल ज्यामध्ये या खात्यातील सर्व पैसे ट्रान्सफर करायचे आहेत.

-बँक खाते बंद करण्यासाठी तुम्हाला स्वत: बँक शाखेमध्ये जावे लागेल

-बँक खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आतमध्ये बंद केल्यास बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. पंधराव्या दिवसापासून 1 वर्षापर्यंतच्या काळात तुम्ही खाते बंद करत असाल तर क्लोजर चार्ज द्यावा लागतो. साधारणपणे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर क्लोजर चार्ज लागत नाही.

First published:

Tags: Bank, Bank details, Bank services, Personal banking