पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील अशा प्रसिद्ध व्यक्तींपैकी आहेत, ज्यांच्याबद्दल केवळ देशातील नाही तर जगभरातील लोकं जाणून घेऊ इच्छितात. नकतीच मोदी यांनी त्यांची गुंतवणूक आणि संपत्तीबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी मालमत्ता आणि दायित्वांबाबत केलेल्या घोषणेनुसार गेल्या 15 महिन्यांत मोदींच्या मुव्हेबल अॅसेट्समध्ये सुमारे 37 लाखांनी वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या मिळकतीचा मोठा भाग गुंतवला आहे. तुम्हाला देखील याठिकाणी पैसे गुंतवायचे असतील तर जाणून घ्या
पीएम मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी मुदत ठेवी आणि बचत खात्यात पैसे जमा करतात. गेल्या आर्थिक वर्षात त्यांची एकूण जंगम मालमत्ता 1 कोटी 39 लाख 10 हजार 260 रुपये होती. आता ती 26.26 टक्क्यांनी वाढून 1 कोटी 75 लाख 63 हजार 618 रुपयांवर गेली आहे. पंतप्रधान मोदींची ही आर्थिक स्थिती 30 जून 2020 पर्यंत आहे. 12 ऑक्टोबर रोजी याचा खुलासा झाला आहे.
मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक: पंतप्रधान मोदींच्या अचल संपत्तीमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. गुजरातच्या गांधीनगरमध्ये त्यांची जमीन आहे, ज्याची किंमत 1.1 कोटी आहे. यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील हिस्सा आहे. पीएम मोदींची जी कमाई होते, त्याचा मोठा हिस्सा एफडीमध्ये गुंतवला जातो. . व्याजातून मिळणारी कमाई कर कपातीनंतर पुन्हा गुंतविली जाते.
टर्म डिपॉझिटवर एवढे मिळते व्याज- मुदत ठेवींविषयी बोलायचे झाले तर, एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याज दर 5.5 ते 6.7 टक्के असेल. त्याचबरोबर पाच वर्षांच्या recurring deposits वरील व्याज दर 5.8 टक्के ठेवण्यात आला आहे. बँक एफडीला बँकिंगच्या भाषेत मुदत ठेव देखील म्हणतात. 7 दिवस ते 10 वर्षे लॉक-इन कालावधी आहे.
मोदी NSC आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात- पीएम मोदींनी मुदत ठेवी व्यतिरिक्त जीवन विमा, नॅशनल सेव्हिंग स्कीम आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाँडमध्येही गुंतवणूक केली आहे. येथे त्यांना गुंतवणूकीद्वारे टॅक्स बेनिफिट देखील मिळतात. माहितीनुसार त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
NSCवर 6.8 टक्के व्याज दर- सरकारने विविध ठेवींवरील नवे व्याज दर नुकतेच जाहीर केले होते. तिसर्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवरील व्याज 6.8 टक्के राहील. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करून इनकम टॅक्स कायदा 80 सी अंतर्गत सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही. या सर्टिफिकेटच्या मॅच्यूरिटीचा कालावधी 5 वर्षे आहे.
मोदींचे मासिक वेतन: पंतप्रधानांचे मासिक वेतन 2 लाख रुपये आहे. त्याच्या बचत खात्यात 3.38 लाख रुपये आहेत. ही माहिती 30 जून 2020 ची आहे, तर 31 मार्च 2019 रोजी त्याच्या बचत खात्यात फक्त 4143 रुपये होते. त्यांनी गांधीनगरच्या एसबीआय शाखेत एफडी केली आहे. ही रक्कम वाढून 1 कोटी 60 लाख 28 हजार 39 रुपये झाली आहे.
पंतप्रधान मोदींकडे स्वत:ची कार नाही. त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. त्यांनी एनएससीमध्ये 8 लाख 43 हजार 124 रुपये जमा केले आहेत. जीवन विम्यांसाठी ते 1 लाख 50 हजार 957 रुपये जमा करतात. 2019-20 या आर्थिक वर्षात त्यांनी एनएससीमध्ये 7 लाख 61 हजार 646 रुपये जमा केले. लाइफ इंश्यूरन्स प्रीमियम म्हणून 1 लाख 90 हजार 347 रुपये जमा केले होते.