आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरूच आहे. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याची किंमत कमी होत आहे. दरम्यान गुरुवारी यामध्ये चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील स्टिम्यूलस पॅकेजमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. त्यामुळे देखील सोन्याचे दर कमी होत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही काळापासून रुपयाचे मुल्य वधारत आहे. परिणामी सोन्याच्या दरात दिवाळीपर्यंत आणखी घसरण होण्याची शक्यता अधिक आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर 631 रुपयांनी कमी होऊन 51,367 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. चांदी देखील 1,681 रुपयांनी कमी झाल्याने दर 62,158 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
मंगळवारी सोन्याचे ट्रे़डिंग 51,998 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. चांदीचे भाव देखील 63,839 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारून 73.31 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,896 डॉलर प्रति औंस तर चांदी 24.16 डॉलर प्रति औंस आहे.
7 ऑगस्ट 2020 रोजी सो्याचे दर सराफा बाजारात 56,254 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. चांदीचे दर देखील यादिवशी 76,008 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. सोन्याच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घेता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अनेक देश त्यांची अर्थव्यवस्था मजबुत करण्याच्या प्रयत्नात आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षापर्यंत डॉलरमधील मजबुतीबरोबरच सोन्याच्या किंमतीत अचानक तेजी येऊ शकते.
कमोडिटी आणि करन्सी सेगमेंटचे व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांच्या मते सोन्यामध्ये कमजोरी काही काळच असेल. दिवाळीदरम्यान सोन्याच्या किंमती पुन्हा वाढू शकतात. मागणी वाढल्यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकगा 52000 रुपयांच्या स्तरावर पोहोचू शकतात. डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याचे दर पुन्हा एकदा 56000 हजार प्रति तोळाचा टप्पा गाठू शकतात. मात्र आता अशी शक्यता अधिक आहे की दर 47000 ते 48000 रुपये प्रति तोळाच्या आसपास राहतील.