मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा! सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे

फसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा! सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India- RBI) ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फ्रॉडबद्दल सतर्क केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India- RBI) ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फ्रॉडबद्दल सतर्क केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India- RBI) ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फ्रॉडबद्दल सतर्क केले आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India- RBI) ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फ्रॉडबद्दल सतर्क केले आहे. ग्राहकांनी कोणताही फोन कॉल (Phone Call), ईमेल (email), एसएमएस (SMS) आणि वेब-लिंक (Web-Link) च्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असा इशारा आरबीआयकडून देण्यात आला आहे. तुम्हाला संशय आल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहक सहाय्यता क्रमांक तपासून पाहा. आरबीआयने असे म्हटले आहे की जाणकार बना, सतर्क राहा. आरबीआयने असे म्हटले आहे की, काही क्षणात फसवणूक होते. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती जसे की, कार्ड डिटेल्स, बॅंक खाते (Bank Account), आधार (Aadhaar), पॅन (PAN) इत्यादी बद्दल कुणाला माहिती देऊ नका. ट्विटरच्या माध्यमातून आरबीआयने असे म्हटले आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास, त्याने तुमची वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स किंवा केवायसी विचारल्यास तुम्ही त्वरित फोन कट करा. 1.48 लाख कोटींची फसवणूक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये तत्कालीन 18 सरकारी बँकांद्वारे एकूण 1,48,428 कोटींच्या फसवणुकीची 12,461 प्रकरणे सूचित करण्यात आली आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आरबीआयकडून ही माहिती मिळाली आहे. आरटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार या फसवणुकीची शिकार देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-State Bank of India)झाली आहे. एसबीआयने 44,612.93 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या 6,964 प्रकरणांबाबत सूचित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात या 18 सरकारी बँकाची जेवढी फसवणूक झाली आहे त्याच्या 30 टक्के रक्कम एसबीआयची आहे. संपादन - जान्हवी भाटकर
First published:

Tags: Rbi

पुढील बातम्या