मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazon Prime Day Sale 2020: यादिवशी मिळणार बंपर सूट, 70% डिस्काउंटने खरेदी करा विविध प्रोडक्ट्स

Amazon Prime Day Sale 2020: यादिवशी मिळणार बंपर सूट, 70% डिस्काउंटने खरेदी करा विविध प्रोडक्ट्स

अ‍ॅमेझॉनने (Amazon) त्यांच्या प्राइम कस्टमर्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी Amazon Prime Day Saleचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली आहे.

अ‍ॅमेझॉनने (Amazon) त्यांच्या प्राइम कस्टमर्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी Amazon Prime Day Saleचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली आहे.

अ‍ॅमेझॉनने (Amazon) त्यांच्या प्राइम कस्टमर्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी Amazon Prime Day Saleचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली आहे.

    मुंबई, 06 ऑगस्ट : अ‍ॅमेझॉनने (Amazon) त्यांच्या प्राइम कस्टमर्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी Amazon Prime Day Saleचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली आहे. दरम्यान 7 तारखेला रात्री 12 पर्यंत प्राइम कस्टमर्सना ही खरेदी करता येणार आहे. या सेल दरम्यान विविध उत्पादनांवर 70 टक्के पर्यंतचे डिस्काउंट (Discount) देण्यात येत आहे. सेल दरम्यानच्या खरेदीवेळी HDFC बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि EMI खरेदीवेळी 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट (Instant Discount)देखील मिळेल. याव्यतिरिक्त नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. अ‍ॅमेझॉन डिव्हाइससह अनेक प्रोडक्ट्सवर मिळतेय चांगली डील प्राइम डे सेलमध्ये Xiaomi OnePlus, आणि सोनीचे लेटेस्ट स्मार्टफोन आणि इलेक्ट्ऱॉनिक तसंच Amazon डिव्हाइस (Echo, Fire TV आणि Kindle e-readers)सह अनेक प्रोडक्ट्सवर चांगले डील मिळत आहे. इको फॅमिलीमधील सर्वात प्रसिद्ध व्हॉइस कंट्रोल स्मार्ट स्पीकर Echo Dot आहे, जो स्लीकआणि कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो. (हे वाचा-या कंपनीत काम करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1500 लोकांची नोकरी जाण्याची शक्यता) इको डॉट अट्रॅक्टिव स्मार्ट कलर लाइट बल्ब बंडलसह उपलब्ध आहे. घरातील लाइट्स दूर राहून देखील नियंत्रणात ठेवता येतात, ज्यासाठी युजरला केवळ अलेक्साच्या माध्यमातून व्हॉइस कमांड द्यावी लागते. किचन प्रोडक्ट्सवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मिक्सर ग्राइंडर, किचन कुक वेअर सेट, वॅक्यूम क्लीनर, गॅस स्टोव्ह, किचन स्टोरेज, वॉटर प्यूरीफायर इ. वस्तूंवर देखील ऑफर आहेत. सेलमध्ये 10000 रुपयांपर्यंत काही फोन देखील उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि अ‍ॅक्सेसरीजवर 60 टक्के सूट सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि अ‍ॅक्सेसरीजवर देखील 60 टक्के सूट दिली जात आहे. यामध्ये  Boat Airpods 441 ची किंमत 5,999 रुपयांऐवजी केवळ 1,999 रुपये करण्यात आली आहे. Sony Alpha 5100L कॅमेऱ्याची किंमत 38,690 रुपयांऐवजी 28,990 रुपये करण्यात आली आहे. व्हिवो  V19 नुकताच लाँच करण्यात आला होता. उत्तम कॅमेरा असणारा हा फोन 30,990 रुपयांना आहे, या सेलमध्ये ग्राहक हा फोन 6000 रुपये डिस्काउंटनंतर 24,990 रुपयांना खरेदी करू शकतात. यावर 2,500 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येत आहे. (हे वाचा-फसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा! सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे) एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येतील लॅपटॉप सेलमध्ये लॅपटॉप 35 हजारांच्या एक्सचेंज ऑफरवर देखील खरेदी करता येतील. यावर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. Samsung Galaxy M31 स्मार्टफोन देखील सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 16,499 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील यावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बजेटमध्ये Xiaomi Redmi 8A Dual, Samsung Galaxy M11 आणि Samsung Galaxy M21 या फोनची देखील खरेदी केली जाऊ शकते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या