नवी दिल्ली, 23 मे: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Coronavirus Pandemic) सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी आल्याचं पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती आणखी नवा रेकॉर्ड रचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याचे दर (24 कॅरेट) 796 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price Today) जवळपास 885 रुपयांनी वधारले आहेत.
केवळ मे महिन्याबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात सोन्याच्या दरात (Gold Price Today) 1762 रुपये प्रति इतकी वाढ झाली आहे. तर चांदीमध्ये जबरदस्त वाढ या महिन्यात पाहायला मिळाली. चांदी मे महिन्यात प्रति किलो 3445 रुपयांनी वधारली आहे.
ऑल टाइम हायवरून 7600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं
या एका महिन्यात सोन्याचे दर जरी वधारले असते तरी गेल्यावर्षीच्या सर्वोच्च किंमतीपेक्षा सोन्याचे दर 7600 रुपयांनी कमीच आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये (August 2020 10 Gram Gold Price) सोन्याचे दर प्रति तोळा 56000 पेक्षाही जास्त होते.
हे वाचा-सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी! मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोनं
दीड महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत तेजी
गेल्या दीड महिन्यापासून सोन्याचे दर चढे आहेत. याआधी सोन्याचे दर निच्चांकी पातळीवर ट्रेड करत होते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)च्या वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत शुक्रवारी बाजार उघडतेवेळी 48,553 रुपये प्रति तोळा होती. गुरुवारी हा दर 48, 593 रुपये प्रति तोळा होता. गुरुवारी बाजार बंद होताना दर कमी होऊन 48,534 प्रति तोळावर पोहोचला होता.
हे वाचा-31 मे आधी खात्यातून कापले जातील 12 रुपये, मिळेल 2 लाखांची सुविधा; वाचा सविस्तर
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी
एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही आर्थिक संकट काळात ही गुंतवणूक कामी येते. त्यामुळे सध्याच्या संकटकाळात गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून वळले आहेत. ज्यामुळे येणाऱ्या काळात तेजी येऊ शकते. शिवाय कोरोना व्हायरस हे देखील सोन्याच्या किंमतीत तेजी येण्याचं एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा पन्नास हजारांच्या वर जाऊ शकतात, त्यामुळे आता तुम्ही सोन्यात गुंतवणूक (Investment in Gold) केली तर ती भविष्यात फायद्याची ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today