मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी! सोमवारपासून मिळेल स्वस्त सोनं, मोदी सरकारच आणतंय ही स्कीम

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी! सोमवारपासून मिळेल स्वस्त सोनं, मोदी सरकारच आणतंय ही स्कीम

जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल या आठवड्यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोनंखरेदी करू शकता.

जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल या आठवड्यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोनंखरेदी करू शकता.

जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल या आठवड्यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोनंखरेदी करू शकता.

नवी दिल्ली, 23 मे: सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) ही अत्यंत पारंपरिक आणि फायद्याची मानली जाते. भारतीयांचा विशेष कल याकडे असतो. दरम्यान सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, अशावेळी स्वस्तात सुवर्णखरेदीची संधी मिळण्याची अनेकजण वाट पाहत असतात. दरम्यान जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल या आठवड्यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

या योजनेमध्ये तुम्ही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोनंखरेदी करू शकता. सरकारकडून ही संधी उपलब्ध केली जात आहे. ही योजना म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond 2021). ही योजना पुन्हा एकदा पाच दिवसासाठी 24 मे ते 28 मे दरम्यान खुली केली जात आहे. या आर्थिक वर्षातील SGB चा पहिला टप्पा 17 मे ते 21 मे रोजी जारी करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील किंमती देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. उद्यापासून ही योजना खुली केली जाणार आहे.

यावेळी काय आहे किंमत?

सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) च्या दुसऱ्या टप्प्यात  4,842 रुपये प्रति ग्रॅम या दराने सोनेखरेदी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यादरम्यान हे मुल्य  4,777 रुपये प्रति ग्रॅम होते.

हे वाचा-31 मे आधी खात्यातून कापले जातील 12 रुपये, मिळेल 2 लाखांची सुविधा; वाचा सविस्तर

ऑनलाइन खरेदीवर मिळेल डिस्काउंट

याचप्रमाणे हे सोने खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा (Buy Gold Online) वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,792 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

कमीत कमी किती कराल गुंतवणूक?

सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड (Gold Bond) जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते.

कुठे करता येईल खरेदी?

तुम्ही गोल्ड बाँडची खरेदी ऑनलाइन करू शकता. याशिवाय याची विक्री बँक, सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता.

हे वाचा-SBI च्या या सूचनांकडे दूर्लक्ष करू नका! अन्यथा येईल कंगाल होण्याची वेळ

कशी ठरते किंमत?

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. यामध्ये तुम्ही एक ग्रॅमच्या पटीमध्ये गुंतवणूक करू शकता. या बाँड्सचा मॅच्यूरिटी पीरिएड 8 वर्षांचा असतो. मात्र तरी देखील 5 वर्षांनी प्रीमॅच्यूअर विड्रॉल करता येते.

महत्त्वाचे फायदे

-मॅच्युरिटीवर गोल्ड बाँड टॅक्स फ्री होतात

-भारत सरकार द्वारे जारी करण्यात येत असल्याने डिफॉल्टची भीती नाही

-फिजिकल गोल्ड ऐवजी गोल्ड बाँड सांभाळणं अधिक सोपं आणि सुरक्षित

-यामध्ये शुद्धतेची समस्या येत नाही आणि किंमती सर्वात शुद्ध सोन्याच्या आधारे निश्चित केल्या जातात.

-एक्झिटचा पर्यायही सोपा आहे

-गोल्ड बाँडच्या आधारे कर्जाची सुविधा मिळते.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today, Gold bond, Sovereign gold bond scheme