मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! Online Shopping करताना तुमची छोटीशी चूकही पडेल महागात; रिकामं होईल Bank Account

सावधान! Online Shopping करताना तुमची छोटीशी चूकही पडेल महागात; रिकामं होईल Bank Account

जपून करा ऑनलाईन शॉपिंग

जपून करा ऑनलाईन शॉपिंग

सध्या कोरोना काळात आणि लॉकडाऊनमध्ये (Corona lockdown) ऑनलाईन शॉपिगचं (Online Shopping ) प्रमाण वाढलं आहे. पण सोबतच ऑनलाईन फसवणुकीचा (Online fraud ) धोकाही वाढला आहे.

दिल्ली, 23 एप्रिल : सध्या ऑनलाईन शॉपिंगची (Online Shopping ) आवड नसणारे लोकही गरज म्हणून ऑनलाइन शॉपिंगला (Online Shopping )  महत्त्व देऊ लागले आहेत. कोरोनाच्या काळात (Period of Cororna)  घरबसल्या तुमच्या गरजेच्या वस्तू तुमच्या घरात सहज पोहोचतात. पण आजकाल ऑनलाइन खरेदी करणं तितकं सुरक्षित (Safe Shopping राहिलं नाही.

ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेतली नाही तर बॅक अकाउंट (BankAccount) रिकामं होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे हे जाणून घेऊयात.

कॅश ऑन डिलीव्हरी ऑप्शन

आपलं बँक अकाऊंट सेफ ठेवण्यासाठी सीओडी किंवा कॅश ऑन डिलीव्हरी ऑप्शन निवडणं निहमी सुरक्षित असतं. त्यामुळे तुम्हाला अकाऊंट डिटेल्स द्यायची गरज पडत नाही. यात सामानाची डिलीव्हरी घेताना पैसे द्यावे लागतात. ऑनलाईन खरेदी करताना तुमच्या एटीएम कार्डचा डिटेल्स कधीही सेव्ह करू नका. बर्‍याच एखाद्या साइटवर कार्डची माहिती भरताना सेव्ह कार्ड डिटेलचा पर्याय येतो आणि त्यावर येस टिकमार्क येतो. बऱ्याच वेळा त्यावर क्लिक होतं. हा पर्याय काळजीपूर्वक पाहून त्यावरचा नो ऑप्शन निवडावा.

हे वाचा - 24 नव्हे या तारखेपासून सुरू होणार लसीकरणासाठी नोंदणी, सरकारचं स्पष्टीकरण

योग्य वेबसाईट किंवा अ‍ॅप निवडा

बनावट वेबसाईट्स आणि अ‍ॅप्स तयार करून हॅकर्स लोकांना बळीचा बकरा बनवतात. म्हणून कोणत्याही वेबसाईट किंवा अ‍ॅपवरून खरेदी करण्यापूर्वी चेक करा. आपल्याला हव्या असलेल्या प्रोडक्टची खरेदी करताना उत्पादनाची अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅप वापरण्याचा प्रयत्न करा. विश्वसनीय वेबसाईट किंवा अ‍ॅपची निवड करा.

 वेबसाइटची URL चेक करा

ऑनलाईन खरेदी करताना आपण ज्या वेबसाइटवरून खरेदी करणार आहात त्याची URL तपासा. वेबसाइटची URL एचटीटीपीएस (HTTPS) ने सुरू व्हायला हवी एचटीटीपीने (HTTP) नाही. एचटीटीपीएसमधील ‘एस’ हा साईट गुगलने (Google) सिक्युअर केली असल्याचं सागतं.

हे वाचा - Amarnath Yatra: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अमरनाथ यात्रेबाबत मोठा निर्णय

शॉपिंगसाठी कॉमन वायफायचा वापर नको

आपलं बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठी खरेदी करताना सार्वजनिक वायफायचा वापर न करता स्वत:चा वायफाय वापरावा. बर्‍याच वेळा लोक सायबर कॅफे किंवा रेस्टॉरंट्ससारख्या सार्वजनिक ठिकाणी असताना सार्वजनिक वायफायद्वारे ऑनलाइन खरेदी करतात. यामुळे हॅकर्स तुमचं अकाऊंट सहजपणे हॅक करू शकतात.

First published:

Tags: Money fraud, Online fraud, Online shopping, Shopping, Shopping debit card