Home /News /money /

सरकारने जारी केला अलर्ट! या 6 वेबसाइटपासून राहा सावधान, अन्यथा बसेल लाखोंचा फटका

सरकारने जारी केला अलर्ट! या 6 वेबसाइटपासून राहा सावधान, अन्यथा बसेल लाखोंचा फटका

देशभरात वाढणारा ऑनलाइन फ्रॉडचा धोका लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइट्सची यादी जाहीर केली आहे. तुम्ही देखील या वेबसाइट वापरत असाल तर सावधानता बाळगणं आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर: देशभरात वाढलेली ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) ची प्रकरणं लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही देखील या वेबसाइटचा वापर करत असाल तर वेळीच सावधान व्हा. नाहीतर तुमच्या खात्यातील रक्कम आणि तुमची  वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. एकीकडे ऑनलाइन नेटवर्कमुळे अनेक कामं सुखकर होत आहेत तर दुसरीकडे फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. पीआयबी (PIB) आणि सरकारी तसंच खाजगी बँकांकडून वेळोवेळी या ऑनलाइन फसवणुकीबाबत सावध केलं जात. ग्राहकांनी या अलर्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. PIB ने जारी केली 6 वेबसाइटची यादी पीआयबीने सहा वेबसाइटची लिस्ट जारी केली आहे. या वेबसाइटपासून युजर्सनी दूर राहणेच त्यांच्या भल्याचे आहे. तुम्ही या वेबसाइटवर व्हिजीट केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तुमच्या आयुष्यभराची कमाई देखील गायब होऊ शकते (हे वाचा-SBI अलर्ट! बँक ग्राहकांनी कुणाला 'ही' माहिती दिली असेल तर होईल लाखोंचं नुकसान) यामध्ये फ्री स्कॉलरशीप किंवा फ्री लॅपटॉमचे आमीष दाखवणाऱ्या वेबसाइट्सचा देखील समावेश आहे. ही आहे या वेबसाइट्सची यादी- >> http://centralexcisegov.in/aboutus.php >> https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/ >> https://kusmyojna.in/landing/ >> https://www.kvms.org.in/ >> https://www.sajks.com/about-us.php >> https://register-form-free-tablet.blogspot.com/ काय काम करतं पीआयबी ? भ्रामक किंवा फसवणूक करणाऱ्या बातम्यांबाबत पीआयबीकडून सामान्य जनतेला जागरुक केलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजबाबतही फॅक्ट चेक करण्याचं  काम PIB कडून केलं जातं. कोरोना काळात सर्वाधिक प्रमाणात चुकीच्या बातम्या, बनावट मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत. याबाबत सामान्यांना माहिती असेलच असं नाही, अशावेळी सरकारचे प्रेस इन्फरमेशन ब्युरो वेळोवेळी बनावट आणि भ्रामक बातम्यांबाबत अलर्ट करत असते. सरकारकडून पीआयबीच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला जात आहे. (हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आजही तेजी,सोनखरेदीआधी तपासा नवे दर) तुम्हाला एखादा मेसेज आल्यास करू शकता फॅक्ट चेक PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Cyber crime

    पुढील बातम्या