नवी दिल्ली, 17 डिसेंबर: देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 17 डिसेंबर 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 194 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीच्या किंमती आज पुन्हा 1000 रुपयांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. एक किलो चांजीच्या किंमतीत आज (Silver Rates Today) 1,184 रुपयांची वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सोन्याचे दर 49,261 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते, तर चांदी 65,785 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली तेजी आणि अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजबाबत निर्माण झालेल्या आशा, यादरम्यान भारतामध्ये सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी आली आहे.
सोन्याचे गुरुवारचे दर (Gold Price, 17 December 2020)
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 194 रुपये प्रति तोळाने वधारले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,455 रुपये प्रति तोळा झाली आहे. पुन्हा एकदा सोन्याचे दर 50 हजार रुपये प्रति तोळा हा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले आहेत. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 49,261 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,874 डॉलर प्रति औंस आहेत.
(हे वाचा-शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 9 लाखांपेक्षा जास्त खात्यांमध्ये 1,252 कोटी जमा)
चांदीचे गुरुवारचे दर (Silver Price, 17 December 2020)
सोन्यापाठोपाठ आज चांदीमध्येही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरांनी 1184 रुपयांची उसळी घेतली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 65,785 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) चांदीचे भाव 25.63 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.
(हे वाचा-SBI अलर्ट! बँक ग्राहकांनी कुणाला 'ही' माहिती दिली असेल तर होईल लाखोंचं नुकसान)
का वाढल्या सोन्याचांदीच्या किंमती?
एसडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities)चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते सोन्याचांदीच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यामुळे देशांतर्गत बाजारातही त्याचा परिणाम झाला आहे. अमेरिकेमध्ये प्रोत्साहन पॅकेजच्या घोषेणेची प्रतीक्षाही गुंतवणूकदारांना आहे. यामुळे डॉलरवर दबाव आहे आणि गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याचांदीच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. मात्र याचवेळी कोरोना लशीसंदर्भात सकारात्मक बातम्यांमुळे सोन्यावर दबाव देखील आहे.