जाहिरात
मराठी बातम्या / मनी / जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की बनावट? प्लॉट खरेदी करण्यापूर्वी या ट्रिकने करा चेक

जमिनीची रजिस्ट्री खरी आहे की बनावट? प्लॉट खरेदी करण्यापूर्वी या ट्रिकने करा चेक

बनावट रजिस्ट्रेशन कसं ओळखावं

बनावट रजिस्ट्रेशन कसं ओळखावं

भारतात रजिस्ट्री करण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या आधारावरच जमिनीची खरेदी-विक्री केली जाते. मात्र यामध्ये अनेकदा फसवणूक होऊ शकते. यामुळेच रजिस्ट्रीदरम्यान कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं हे आपण आज पाहणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 एप्रिल: देशात जमिनीच्या रजिस्ट्रीसंबंधी घोटाळे आणि फसवणुकीचे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. अनेकदा फसवणूक करणारे सरकारी जमिनीच्या एकाच जागेची पुन्हा पुन्हा रजिस्ट्री करुन लोकांना चुना लावत असतात. अशी फसवणूक आपल्यासोबत होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. यासाठी खऱ्या आणि बनावट रजिस्ट्रीमधील फरक माहिती असायला हवा. खरं तर, मालमत्ता खरेदी केल्यानंतर, त्याची मालकी विक्रेत्याकडून खरेदीदाराच्या बाजूने हस्तांतरित करण्याला रजिस्ट्री म्हणतात. रजिस्ट्री करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरुन बनावट रजिस्ट्री शोधता येईल. याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

जमिनीच्या रजिस्ट्री संबंधित फसवणुकीचे प्रकार

एका अंदाजानुसार, दरवर्षी देशातील 40 टक्के रजिस्ट्री बनावट होतात. सामान्यतः लोक फक्त जमिनीची रजिस्ट्री आणि खटौनी डॉक्यूमेंट्स पाहतात पण हे पुरेसे नाही कारण ही कागदपत्रे पाहून हे निश्चित केले जाऊ शकत नाही की विक्रेत्याला जमिनीचा मालकी हक्क आहे की नाही? फसवणुकीचे किती प्रकार असतात ते पाहूया… - एकाच जमिनीची दुहेरी रजिस्ट्री - सरकारी जमिनीची रजिस्ट्री - प्रलंबित जमीन प्रकरणाची रजिस्ट्री - कर्ज गहाण ठेवलेल्या जमिनीची नोंदणी

लोन घेणाऱ्यांनो तुमचे अधिकार माहितीये का? तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही धमकी

फसवणूक होऊ नये म्हणून काय चेक करावं?

जमिनीच्या रजिस्ट्रीमधील फसवणुकीशी संबंधित प्रकरणे टाळण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही जमिनीची नवीन आणि जुनी रजिस्ट्री पाहावी. जी व्यक्ती तुम्हाला जमीन विकत आहे, त्याने ती जमीन दुसऱ्याकडून विकत घेतली असेल, तर त्या व्यक्तीला जमिनीची रजिस्ट्री करून घेण्याचा कायदेशीर अधिकार होता का? तिथं खताउनी तपासून घ्यावी. जर तुम्हाला ही कागदपत्रे समजत नसतील तर या प्रकरणांशी संबंधित कायदेशीर तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

एकत्रीकरण रेकॉर्ड 41-45 तपासा

एकत्रीकरणाचे 41 आणि 45 अभिलेख पाहावेत. त्यावरून ही जमीन कोणत्या श्रीणीची आहे हे कळू शकेल. ही जमीन सरकारी तर नाही किंवा चुकून विक्रेत्याच्या नावावर तर आलेली नाही ना… हे एकदा तपासून घ्या. एकत्रीकरणाच्या 41 आणि 45 नोंदीवरून जमिनीची खरी स्थिती स्पष्ट होते. ती जमीन सरकारची, वन विभागाची किंवा रेल्वेची आहे का याविषयी माहिती मिळते. ही जमिनीची सर्वात महत्त्वाची नोंद आहे.

तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरं की बनावट? कसं ओळखायचं? ही आहे ट्रिक

जमिनीशी संबंधित कायदेशीर वादांची माहिती घ्या

अनेक वेळा मृत्युपत्र किंवा डबल रजिस्ट्रीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असते. म्हणूनच तुम्ही जेव्हाही जमीन खरेदी कराल तेव्हा त्यावर एखादी केस प्रलंबित आहे का ते एकदा तपासा. हे तहसीलमधील जमिनीच्या डेटा क्रमांकावरून आणि जमीन मालकाच्या नावावरून कळू शकते.

गहाण ठेवलेली जमीन आहे का?

याशिवाय गहाण ठेवलेली जमीन म्हणजेच ज्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज आहे का? ते तपासून खात्री करून घ्यावी. त्याचवेळी, ज्या व्यक्तीने तुम्हाला जमीन विकली आहे, ती जमीन प्रत्यक्षात त्याच्या ताब्यात आहे का, हे देखील तपासले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: fraud
  • First Published :
जाहिरात
जाहिरात