मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतकऱ्यांसाठी कमाईची सुवर्णसंधी, मोदी सरकार या योजनेसह देतंय महत्त्वाच्या सुविधा; वाचा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी कमाईची सुवर्णसंधी, मोदी सरकार या योजनेसह देतंय महत्त्वाच्या सुविधा; वाचा सविस्तर

केंद्र सरकारची कुसुम योजना  (PM Kusum Scheme) शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सोलर उपकरणं बसवून सिंचन करू शकतात. आणखीही काही फायदे या योजनेअंतर्गत मिळत आहेत.

केंद्र सरकारची कुसुम योजना (PM Kusum Scheme) शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सोलर उपकरणं बसवून सिंचन करू शकतात. आणखीही काही फायदे या योजनेअंतर्गत मिळत आहेत.

केंद्र सरकारची कुसुम योजना (PM Kusum Scheme) शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सोलर उपकरणं बसवून सिंचन करू शकतात. आणखीही काही फायदे या योजनेअंतर्गत मिळत आहेत.

नवी दिल्ली, 20 मे:  केंद्र सरकारची (Modi Government) कुसुम योजना (PM Kusum Scheme) शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सोलर उपकरणं बसवून सिंचन करू शकतात. शेतात अनेकदा वीज किंवा डिझेलवर चालणारा पंप बसवला जातो, जेणेकरून शेताला पाणी देता येई. पण कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही सोलर पॅनल (Solar Panel) बसवून सिंचन करू शकता. शिवाय अतिरिक्त वीज बनवून ती ग्रीडला पाठवून आणखी कमाई देखील करू शकता.

काय आहे पंतप्रधान कुसुम योजना?

पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (पंतप्रधान-KUSUM) योजना नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) 2020 मध्ये सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या जागेवर सौर पंप बसवून आपल्या शेतासाठी सिंचन करू शकतात. केंद्र सरकारचे उद्दीष्ट हे आहे की या योजनेंतर्गत देशात विद्युत आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपाच्या जागी अशाप्रकारे सौरपंप बसवले जावेत

हे वाचा-SBI मध्ये तुमचंही अकाऊंट आहे का? सर्वात मोठ्या बँकेने बदलले आपले नियम

शेतकऱ्यांना काय होईल फायदा?

केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा दोन प्रकारे शेतकरी लाभ घेत आहेत. पहिला फायदा म्हणजे शेतकरी शेतात सिंचनासाठी मोफत वीजेचा वापर करू शकतील. दुसरा फायदा असा आहे की जर शेतकऱ्यांनी अधिकची वीज बनविली आणि ती ग्रीडवर पाठविली तर त्या बदल्यात पैसेही मिळतील. म्हणजेच या योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. एवढेच नाही तर नापीक जमीन असणारे शेतकरी आपल्या जमिनीचा वापर सौर उर्जा निर्मितीसाठी देखील करू शकतात. म्हणजे नापीक जमीन देखील शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे स्रोत बनत आहे.

हे वाचा-LIC ची मुलींसाठी खास पॉलिसी! रोज 150 रुपये भरा, लग्नावेळी मिळतील 22 लाख रुपये

सरकार देईल 60 टक्क्यांपर्यंत सब्सिडी

तुमचे कृषी पंप सौरऊर्जेचे करण्यासाठी सरकारकडून 60 टक्के अनुदान दिले जाईल. ही योजना राज्य सरकारच्या विभागांमार्फत राबविण्यात येत असून त्यामध्ये शेतकऱ्यांना उर्वरित पैकी केवळ 40 टक्के रक्कम विभागाकडे जमा करायची आहे. या विभागांबाबत अतिरिक्त माहिती MNRE ची वेबसाइट www.mnre.gov.in यावर उपलब्ध आहे.

First published:
top videos

    Tags: PM Kisan, PM narendra modi