नवी दिल्ली, 19 मे : आपल्या देशात बहुतेक लोक मुलीचा जन्म होताच तिच्या चांगल्या भविष्यासाठी बचत (Saving) करण्यास सुरवात करतात. यासाठी मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा अंदाजित खर्च लक्षात घेऊन पालक गुंतवणूक योजना तयार करतात. जर तुम्हीही तुमच्या लाडक्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मुलींसाठी खास पॉलिसी राबवत आहे. या योजनेंतर्गत आपण दररोज थोड्या पैशांची बचत करून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (LIC) मुलींच्या लग्नासाठी चालविल्या जाणार्या या विशेष योजनेत तुम्हाला 22 लाख रुपये एकरकमी मिळणार आहेत. पॉलिसीअंतर्गत तुम्हाला दररोज 150 रुपये गुंतवावे लागतात. जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वयाची होईल त्यावेळी तिच्या लग्नासाठी तुम्हाला 22 लाख रुपये मिळतील. विशेष म्हणजे ही पॉलिसी घेतल्यानंतर समजा दुर्दैवानं वडिलांचा मृत्यू झाला तर तिथून पुढे कोणतीही रक्कम भरावी लागत नाही. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, वडिलांचा जर मृत्यू झाला तर प्रीमियम (150 रुपये) भरला नाही तरीही पॉलिसी सुरू राहणार. त्यानंतर पैसे भरावे लागणार नाहीत. एवढेच नव्हे तर वडिलांचा मृत्यू झाला तर नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला त्वरित 10 लाख रुपयेही मिळतील. या व्यतिरिक्त जर एखाद्या अपघातानं वडिलांचा मृत्यू झाला तर त्यावेळी नुकसान भरपाई 20 लाख रुपये मिळतील. हे वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल मुलीचे शिक्षण व इतर खर्चासाठी दरवर्षी १ लाख रुपये एलआयसीच्या या विशेष पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुलीचे लग्न होईपर्यंत दरवर्षी १ लाख रुपये अभ्यास किंवा इतर खर्चासाठी तुम्हाला मिळत राहतील. हे पैसे मिळत राहून पॉलिसीदेखील सुरू राहील. अद्याप ही आपल्या मनात काही शंका असल्यास किंवा सर्व नियम-अटी व्यवस्थित पाहायच्या असल्यास अधिक माहितीसाठी आपण एलआयसीच्या (LIC) वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय जवळच्या एलआयसी एजंटकडून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.