मराठी बातम्या /बातम्या /मनी /12 लाखात सुरू करा ऑनलाइन पेट्रोल-डिझेलचा व्यवसाय; काही वर्षातच व्हाल 100 कोटींचे मालक

12 लाखात सुरू करा ऑनलाइन पेट्रोल-डिझेलचा व्यवसाय; काही वर्षातच व्हाल 100 कोटींचे मालक

तुम्हाला तुमचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल, तर सध्या ऑनलाइन पेट्रोल-डिझेल विक्रीचा (online fuel business) व्यवसाय तेजीत आहे. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकता.

तुम्हाला तुमचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल, तर सध्या ऑनलाइन पेट्रोल-डिझेल विक्रीचा (online fuel business) व्यवसाय तेजीत आहे. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकता.

तुम्हाला तुमचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल, तर सध्या ऑनलाइन पेट्रोल-डिझेल विक्रीचा (online fuel business) व्यवसाय तेजीत आहे. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकता.

    नवी दिल्ली, 08 एप्रिल: तुम्हाला तुमचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल, तर सध्या ऑनलाइन पेट्रोल-डिझेल विक्रीचा (online fuel business) व्यवसाय तेजीत आहे. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकता. वर्षभरात तब्बल 100 कोटी रुपये मिळवून देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. सरकारही या व्यवसायासाठी मदत करते. देशातील प्रमुख तेल कंपन्या इंडियन ऑइल कार्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL), पेट्रोलियम प्रोसेस इंजिनीअरिंग सर्व्हिस कार्पोरेशन (PESCO) आदी कंपन्याही या ऑनलाइन वितरणासाठी अनुकूल आहेत. या व्यवसायाबाबत आम्ही स्टार्टअप (Startup) कंपनी पेपफ्युएल डॉट कॉमशी (Pepfuel.com) बातचीत केली, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

    सरकारमान्य स्टार्ट अप

    पेपफ्युएल डॉट कॉम ही सरकारी मान्यता प्राप्त स्टार्टअप कंपनी असून, इंडियन ऑइलबरोबर या कंपनीचं थर्ड पार्टी अॅग्रीमेंट आहे. घरोघरी डिझेल वितरणासाठी हा करार आहे. पेपफ्युएलच्या अ‍ॅपवर (App) ग्राहक ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे ऑर्डर देऊ शकतात आणि त्यांना इंधन घरपोच मिळू शकते. नोएडाचे टिकेंद्र, प्रतीक आणि संदीप या तीन तरुणांनी एकत्र येऊन ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. अवघ्या काही वर्षातच त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 100 कोटींवर पोहोचली आहे.

    (हे वाचा-Gold Price Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा उतरला सोन्याचा भाव)

    कसा सुरू केला व्यवसाय?

    या स्टार्टअपचे संस्थापक टिकेंद्र यांनी सांगितलं की, हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी याबाबत बराच अभ्यास केला. घरोघरी जाऊन लोकांशी चर्चा केली, त्यांची मतं जाणून घेतली. ऑनलाइन प्रतिसादही (Online Feedback) मागवले. यामध्ये प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीनं असा फीडबॅक दिला की पेट्रोल-डिझेलसाठी अॅपची आवश्यकता व्यक्त केली. पेट्रोल (Petrol), डिझेलचं (Diesel) ऑनलाइन वितरण करणं हे धोकादायक होतं, तरीही या तिघांनी या अभिनव व्यवसायाचा पाया घालण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून सुरुवातीला डिझेल वितरणाची परवानगी मिळाली. त्यानंतर पेट्रोल वितरणाची परवानगी मिळायला 2016 साल उजाडावं लागलं. सुरुवातीला डिझेल वितरणाची परवानगी असल्यानं त्यापासूनच व्यवसायाची सुरुवात केली.

    तेल कंपन्यांचे सहकार्य

    या कंपनीचे अन्य संस्थापक संदीप यांनी सांगितलं की, आमच्या या व्यवसायाच्या प्रस्ताव आम्ही इंडियन ऑइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम, पेट्रोलियम प्रोसेस इंजिनीअरिंग सर्व्हिस कार्पोरेशन इत्यादी तेल कंपन्यांना पाठवला होता. तसेच या स्टार्टअपची संकल्पना पंतप्रधान कार्यालयालाही (PMO) पाठवली होती. काही दिवसातच पंतप्रधान कार्यालयाकडून सकारात्मक उत्तर आलं, तसंच फरीदाबाद इथल्या इंडियन ऑइल कार्पोरेशननंही आमच्या व्यवसायाचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) पाठवायला सांगितला. त्यानुसार आम्ही त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवला आणि त्यांनी परवानगीदेखील दिली. त्यांची परवानगी मिळताच आम्ही आमच्या या अभिनव व्यवसायाला सुरुवात केली.

    First published:
    top videos

      Tags: Business News, Money, Petrol and diesel, Startup, Startup Success Story