नवी दिल्ली, 08 एप्रिल: दोन दिवसाच्या वाढीनंतर आज पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत. एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याची किंमत (Gold Price Today) 0.1 टक्के अर्थात 96 रुपयांनी घसरली आहे. या घसरणीनंतर भाव 46,320 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदे किंमत (Silver Price Today) 0.34 टक्के अर्थात 228 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा भाव 66,405 रुपये प्रति किलो झाला आहे. आधीच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत 0.9 टक्क्याने तेजी पाहायला मिळाली होती तर चांदीच्या किंमतीत 1.1 टक्क्याने वाढ झाली होती. याशिवाय रुपयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.
काय आहे महानगरातील भाव?
8 एप्रिल रोजी देशातील विविध महानगरातील सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,880 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 45,350 रुपये, 47,280 रुपये, 47,80 रुपये प्रति तोळा आहे.
(हे वाचा-RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही,सामान्यांवर काय होणार परिणाम)
आंततराष्ट्रीय बाजारात काय आहेत दर?
ग्लोबल मार्केटबद्दल बोलायचं झालं तर आज याठिकाणी सोन्याचे दर स्थीर आहेत. बुधवारी याठिकाणी 0.3 टक्क्याने घसरण होऊन सोन्याचे दर 1,737.02 डॉलर प्रति औंस होते. तर चांदीचे दर 0.05 डॉलरच्या घसरणीनंतर 25.11 डॉलरच्या स्तरावर होते.
बुधवारी काय होते दर?
दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 45,181 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. ज्यामध्ये 587 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर 24 कॅरेट सोनं आता 45,768 रुपये झालं होतं. तर चांदीच्या किंमतीमध्ये 682 रुपयांच्या तेजीनंतर दर 65,468 रुपये प्रति किलोग्राम झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Multi exchange commodity, Silver prices today