या LIC च्या योजनेत करा गुंतवणूक, एकदाच हप्ता भरल्यानंतर दरमहा मिळतील 14000

या LIC च्या योजनेत करा गुंतवणूक, एकदाच हप्ता भरल्यानंतर दरमहा मिळतील 14000

Jeevan Akshay Policy: आज आम्ही तुम्हाला LIC च्या अशा पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एकदा पैसे गुंतवल्यांनतर तुमची कमाई आयुष्यभर सुरू राहील

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: देशातील सर्वात विश्वासाची विमा कंपनी असणाऱ्या LIC कडून देशभरातील नागरिकांसाठी विविध विमा पॉलिसी आणल्या जातात. नागरिकांच्या भविष्याचा विचार करता LIC च्या विमा पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही फायद्याची ठरेल. अशावेळी तुम्हाला जर पेन्शनची चिंता असेल तर एलआयसीची  'जीवन अक्षय' पॉलिसी बेस्ट आहे. यामध्ये एकरकमी गुंतवणूक करून पेन्शन मिळवता येते. एलआयसीच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या पॉलिसीपैकी ही एक पॉलीसी आहे. एलआयसीने जीवन शांती योजना सुरू केल्यानंतर जीवन अक्षय पॉलिसी स्थगित केली होती, मात्र ती आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

नवीन पद्धतीने आणण्यात आलेली जीवन अक्षय VII ही योजना LIC ऑफ इंडियाची इमिडिएट अ‍ॅन्यूटी योजना आहे. ही पॉलिसी खरेदी करताना सुरुवातीलाच  अ‍ॅन्यूटी दराची गॅरंटी दिली जाते. पॉलिसीधारकाला आयुष्यभर Annuity चे पेमेंट केले जाते. ही पॉलिसी ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी केली जाऊ शकते.

ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी नियम आणि अटी

-ही योजना 30 ते 85 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते.

-ही पॉलिसी तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यांसाठी किंवा एका वर्षाच्या अ‍ॅन्यूटी मोडमध्ये खरेदी करू शकता.

(हे वाचा-RBI ने बदलला तुमच्या ATM कार्डबाबतचा नियम, 1 जानेवारीपासून करता येईल इतकं पेमेंट)

-यामध्ये ग्राहकांनी कमीतकमी एक लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल आणि कमीत कमी वार्षिक पेन्शन 12 हजार आहे.

-दिव्यांगजनांना फायदा मिळवण्यासाठी देखील ही योजना खरेदी केली जाऊ शकते.

-पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनी लोन सुविधा देखील मिळते. अर्थात या कालावधीनंतर पॉलिसीधारक कर्ज घेऊ शकतात.

या पॉलिसीत पेन्शन मिळवण्यासाठी आहेत 10 पर्याय, त्यापैकी काही पर्याय पुढीलप्रमाणे

पर्याय A- इमिडिएट अ‍ॅन्यूटी फॉर लाइफ

पर्याय B- 5 वर्षांच्या गॅरंटिड कालावधीसह इमिडिएट अ‍ॅन्यूटी आणि त्यानंतर आयुष्यभर पेमेंट

पर्याय C- 10 वर्षांच्या गॅरंटिड कालावधीसह इमिडिएट अ‍ॅन्यूटी आणि त्यानंतर आयुष्यभर पेमेंट

पर्याय D- 15 वर्षांच्या गॅरंटिड कालावधीसह इमिडिएट अ‍ॅन्यूटी आणि त्यानंतर आयुष्यभर पेमेंट

पर्याय E- 20 वर्षांच्या गॅरंटिड कालावधीसह इमिडिएट अ‍ॅन्यूटी आणि त्यानंतर आयुष्यभर पेमेंट

पर्याय F- परचेज प्राइसच्या रिटर्नसह आयुष्यभर अ‍ॅन्यूटी

पर्याय G- वार्षिक 3 टक्क्याच्या साधारण व्याजासह आयुष्यभर अ‍ॅन्यूटीचे पेमेंट

(हे वाचा-RBI चा रेपो रेट कमी न करण्याचा निर्णय, व्याजदराचा सामान्यांवर काय होतो परिणाम?)

यापैकी एक 'Annuity Payable for life at a uniform rate' (पर्याय A) हा पर्याय तुम्ही लगेच पेन्शन मिळवण्यासाठी निवडू शकता. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही जेव्हा पैसे गुंतवाल त्यानंतर लगेचच दरमहा पेन्शन मिळेल. उदाहरणार्थ- तुमचे वय  35 असेल आणि सम एश्योर्ड-  3000000 रु आहे. तर यासाठी तुम्हाला एकरकमी प्रीमियम  3054000 रु द्यावा लागेल.

कसे मिळतील महिना 14 हजार?

या पॉलिसीमध्ये तुम्ही कमीतकमी 1,00,000 रुपये गुंतवू शकता. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणती मर्यादा नाही आहे. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये एकरकमी 3054000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल तेव्हा तुमच्या खात्यात 19 हजार रुपये महिना पेन्शन येईल. वाचा उदाहरणार्थ-

वय- 35 वर्षे

सम अश्योर्ड- 3000000

एकरकमी प्रीमियम- 3054000

पेन्शन-

वार्षिक- 179100

अर्धवार्षिक-88050

तिमाही-43688

मासिक- 14475

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 4, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या