Home /News /money /

RBI ने बदलला तुमच्या ATM कार्डबाबतचा नियम, 1 जानेवारीपासून करता येईल इतकं पेमेंट

RBI ने बदलला तुमच्या ATM कार्डबाबतचा नियम, 1 जानेवारीपासून करता येईल इतकं पेमेंट

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी कॉन्टॅक्टलेस कार्डची पेमेंट मर्यादा वाढवली असल्याचे जाहीर केले आहे. ही सुविधा 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी शुक्रवारी संपर्करहित कार्ड्स (Contact less Cards) ची पेमेंट मर्यादा 2000 रुपयांवरून वाढवून 5000 रुपये केली आहे. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्ड होल्डरला एखाद्या ठिकाणी पैसे भरताना स्वाइप करण्याची आवश्यकता नसते. पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनच्या जवळ कार्ड नेल्यास पेमेंट होऊ शकते. कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डमध्ये दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जातात - 'नियर फील्ड कम्युनिकेशन' आणि 'रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन' (आरएफआयडी). जेव्हा या तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेले कार्ड मशीनजवळ योग्य पद्धतीने आणल्यास, स्वयंचलितपणे पेमेंट केले जाते. जर कार्ड मशीनच्या 2 ते 5 सेंटीमीटरच्या रेंजमध्ये असेल तरच पैसे भरता येऊ शकतात. यासाठी मशीनमध्ये कार्ड इनसर्ट करण्याची किंवा ते स्वाइप करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीमध्ये पिन किंवा ओटीपीची देखील आवश्यक नाही. कॉन्टॅक्टलेस देयकासाठी कमाल मर्यादा 2,000 रुपये होती. ती वाढवून आता 5 हजार करण्यात आली आहे. कोरोना काळात अशाप्रकारे मर्यादा वाढवल्यामुळे ग्राहकांना फायदाच होणार आहे. अशाप्रकारे एका दिवसात एकूण पाच संपर्कविहीन व्यवहार करता येतात. या रकमेपेक्षा जास्त देय देण्यासाठी, पिन किंवा ओटीपी आवश्यक आहे. (हे वाचा-व्याजदरात कोणताही बदल नाही, सामान्यांना स्वस्त EMIसाठी वाट पाहावी लागणार) याशिवाय रिअल टाइन ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सेवा देखील 24x7x365 उपलब्ध करण्यास त्यांनी सांगितले आहे. पुढील आठवड्यापासून ही सेवा लागू करण्याचे सांगितले आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही आता RTGS च्या माध्यमातून 24 तास पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या ही सेवा केवळ महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सोडल्यास आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. आरबीआयच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी मंगळवारपासून सुरू असणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील निर्णय आज जाहीर करण्यात आले. त्यानंतर शेअर बाजारात विक्रमी तेजी दिसून येत आहे. जरी आरबीआयने व्याज दरात बदल केलेला नाही. परंतु आर्थिक वाढीबाबत अंदाज बांधला गेला. ज्याचा परिणाम दोन्ही प्रमुख निर्देशांकावर दिसून येतो. बीएसईचा 30 शेअर्सचा मुख्य सेन्सेक्स निर्देशांक 400 अंकांनी वाढून 45,000 च्या वर गेला. त्याचबरोबर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी 110 अंकांनी वाढून 13,244 च्या विक्रमी पातळीवर गेला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या