LIC Money Back Plan: रोज 160 रुपयांची बचत करून व्हा 23 लाख रुपयांचे मालक, 5 वर्षात घेऊ शकता लाभ

LIC Money Back Plan: रोज 160 रुपयांची बचत करून व्हा 23 लाख रुपयांचे मालक, 5 वर्षात घेऊ शकता लाभ

जर तुम्ही देखील छोटी बचत करून मोठी कमाई करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. LIC Money Back Plan मध्ये गुंतवणूक करून तुम्ही 23 लाख रुपयांचे मालक बनू शकता. जाणून घ्या काय आहे योजना

  • Share this:

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: एलआयसी (Life Insurance Corporation of India- LIC) एक सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून अनेक प्रकारचे विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. जर तुम्हाला देखील कमी गुंतवणुकीतून चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. एलआयसीच्या काही योजना शॉर्ट टर्म तर काही लाँग टर्म असतात.  एलआयसीने एक प्लॅन लाँच केला आहे. या योजनेचं नाव एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसी (LIC New Money Back Policy) असून जाणून घ्या तुमच्यासाठी कशी फायद्याची आहे ही योजना

काय आहे ही योजना?

LIC ची ही नॉन लिंक्ड लाइफ इन्शूरन्स योजना आहे. या योजनेची खासियत अशी आहे की, पॉलिसीधारकाला दर 5 वर्षांनी काही ठराविक रक्कम 'मनी बॅक'च्या स्वरुपात मिळत असते. त्याचप्रमाणे मॅच्यूरिटीवेळी उत्तम रिटर्न आणि टॅक्श इन्शूरन्स बेनिफिट हे फायदे देखील मिळतात. ज्यामध्ये एक गॅरंटिड रिटर्न आणि बोनस मिळतो.

(हे वाचा-कोरोना संकटकाळात या इंडस्ट्रीमध्ये मिळतील नोकऱ्या, 10 लाख लोकांना मिळेल रोजगार)

मॅच्यूरिटीवेळी मिळणारी रक्कम असते टॅक्स फ्री

ही योजना घेण्यासाठी तुमच्याकडे 20 वर्ष आणि 25 वर्ष असे दोन पर्याय आहेत. ही पॉलिसी पूर्णपणे करमुक्त (Tax Free) पॉलिसी आहे. याशिवाय या पॉलिसीतील व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्यूरिटीवेळी मिळणारी रक्कम यावरही टॅक्स लागणार नाही. या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षांसाठी दररोज 160 रुपये गुंतवले तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपये मिळतील.

(हे वाचा-या दिवसापर्यंत येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे, पीएम मोदींनी दिली माहिती)

13 ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात फायदा

एलआयसीच्या माहितीनुसार ही योजना 13 ते 50 वयोगटातील कोणतीही व्यक्ती खरेदी करु शकते. पॉलिसीधारकाला प्रत्येक पाचव्या वर्षी अर्थात 5व्या, 10व्या, 15व्या, 20व्या वर्षी 15 ते 20 टक्के मनी बॅक मिळेल. मात्र हे तेव्हाच होईल जेव्हा प्रीमियम कमीत कमी 10 टक्के जमा झालेला असेल. त्याचप्रमाणे मॅच्यूरिटीवेळी ग्राहकांना बोनस देखील देण्यात येईल. एकूण 10 लाखाच्या या प्लॅनमध्ये अपघाती मृत्यूचा देखील लाभ मिळेल. मॅच्यूरिटीनंर गुंतवणुकदारांना बोनस देखील दिला जाईल.

 

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 19, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading