Home /News /money /

नोकरी गेली तरीही EMI चं नो टेन्शन! जाणून घ्या काय आहे आर्थिक सुरक्षा देणारी 'जॉब लॉस पॉलिसी'

नोकरी गेली तरीही EMI चं नो टेन्शन! जाणून घ्या काय आहे आर्थिक सुरक्षा देणारी 'जॉब लॉस पॉलिसी'

अचानक नोकरी गेली, तर आर्थिक सुरक्षा देणारी काहीतरी पर्यायी व्यवस्था असावी, अशी गरज सर्वांनाच भासत होती. कोरोनाच्या संकटानं याचं गांभीर्य तीव्रतेनं लक्षात आलं. अशावेळी कर्ज असेल तर त्याचे हप्ते कसे भरायचे हे देखील टेन्शन असतं.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर:  ‘कोविड 19’च्या साथीमुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे तोट्यात गेले, बंद झाले, त्यामुळं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांचीही आर्थिक घडी विस्कटून गेली. कर्जाचा बोजा असलेल्या लोकांवर तर आभाळच कोसळलं. कारण कर्जाचे हप्ते भरायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. खरं तर खासगी क्षेत्रात (Private Sector) नोकरी करणाऱ्या लोकांवर कायमच नोकरी जाण्याची (Job Loss) टांगती तलवार असते. त्यामुळं अचानक नोकरी गेली, तर आर्थिक सुरक्षा देणारी काहीतरी पर्यायी व्यवस्था असावी, अशी गरज सर्वांनाच भासत होती; कोरोनाच्या संकटानं याचं गांभीर्य तीव्रतेनं लक्षात आलं. विमा कंपन्यांनी (Insurance Companies) ही गरज ओळखून एक अनोखी पॉलिसी जारी केली आहे. ही आहे जॉब लॉस पॉलिसी (Job Loss Policy). त्यामुळे आता कर्जाचा (Loan) बोजा असणाऱ्या लोकांनाही काळजीचं कारण नाही. देशातील अनेक जनरल इन्शूरन्स कंपन्यांनी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा समावेश असणारी ही पॉलिसी जारी केली आहे. (हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये आजही तेजी,सोनखरेदीआधी तपासा नवे दर) जॉब लॉस पॉलिसी काय आहे, याचा फायदा काय आहे? नोकरी करणारे आणि व्यावसायिक यांच्यासाठी या पॉलिसीअंतर्गत वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. समजा एखाद्या नोकरदार व्यक्तीची अचानक नोकरी गेली तर त्याच्या कर्जाचे तीन महिन्यांचे हप्ते अर्थात ईएमआय (EMI) विमा कंपनी भरेल. तसेच अंशतः किंवा पूर्णतः अपंगत्व आलं तर इन्शूरन्स कव्हर असणाऱ्या त्या व्यक्तीला साप्ताहिक वेतनाचा लाभ घेता येईल. दर आठवड्याला 1 लाख रुपयापर्यंत असे जास्तीत जास्त शंभर आठवडे पैसे मिळू शकतात. त्याशिवाय गंभीर आजार, अंशतः स्थायी अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठीही पर्याय उपलब्ध आहेत. या पॉलिसी खरेदी केल्यानंतर करामध्ये देखील सवलत मिळते. इनकम टॅक्स कायदा सेक्शन 80 डी अंतर्गत या पॉलिसीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रीमियमवर करसवलत मिळू शकते. (हे वाचा-SBI अलर्ट! बँक ग्राहकांनी कुणाला 'ही' माहिती दिली असेल तर होईल लाखोंचं नुकसान) कुठून खरेदी करता येईल ही पॉलिसी? ऑनलाईन इन्श्युरन्स मार्केटप्लेसनं (Online Insurance Market Place) एक नवीन विभाग सुरू केला असून त्याद्वारे ग्राहक जॉब किंवा इन्कम लॉस पॉलिसी खरेदी करू शकतात. एसबीआय जनरल, श्रीराम जनरल, युनिव्हर्सल सोम्पो आणि आदित्य बिर्ला इन्शूरन्स कंपनी या कंपन्यांनी अशा पॉलिसीज बाजारात आणल्या आहेत. त्यापैकी आपल्याला आवडेल ती पॉलिसी ग्राहक घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Insurance

    पुढील बातम्या