या मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने Post Office मध्ये उघडा खातं, घरबसल्या करता येतील अनेक कामं

या मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने Post Office मध्ये उघडा खातं, घरबसल्या करता येतील अनेक कामं

ज्या लोकांचे पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये खातं आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या माध्यमातून बॅलन्स तपासण्याव्यतिरिक्त पैशांची ट्रान्सफर आणि इतर काही आर्थिक व्यवहार देखील करू शकता

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: जर तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्याचा विचार करत असाल तर मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने डिजिटल सेव्हिंग खाते (Digital Saving Account) उघडू शकता. पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना आयपीपीबी मोबाइल अ‍ॅपच्या  (IPPB Mobile App) मदतीने ही सुविधात देत आहे. ज्या लोकांचे पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये खातं आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या माध्यमातून बॅलन्स तपासण्याव्यतिरिक्त पैशांची ट्रान्सफर आणि इतर काही आर्थिक व्यवहार देखील करू शकतात. याकरता तुम्हाला मोठ्या रागांमध्येही उभं राहण्याची गरज नाही. जाणून घ्या कशाप्रकारे उघडाल खातं आणि कोणते व्यवहार या माध्यमातून तुम्ही ऑनलाइनही करू शकता

अशाप्रकारे उघडा IPPB Mobile App द्वारे खातं

>> इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे में खाता खुलवाने के लिए आवेदक को 18 साल का होना जरूरी है.

>> अर्जदार भारतीय नागरिक असायला हवा

>>सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोनमध्ये IPPB Mobile Banking App डाउनलोड करून घ्या

>>App मध्ये ‘Open Account’ वर क्लिक करा

(हे वाचा-20 देशांसाठी भारताचं कोरोना व्हॅक्सिन ठरतंय संजीवनी, 2.29 कोटी लशीचे डोस पाठवले)

>> याठिकाणी तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल

>> तुम्ही जो नंबर इनसर्ट केला असेल त्यावर आलेला ओटीपी (OTP) त्यामध्ये प्रविष्ट करा

>> या माहितीमध्ये तुम्हाला आईवडिलांचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी इ. माहिती भरावी लागेल

>> यानंतर सबमिट वर क्लिक करा

>> अशाप्रकारे तुमचे खाते सुरू होईल

(हे वाचा-दीड लाखांचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापलं; नागपूरातील कुटुंब अंधारात)

खातेधारकांना त्यांचे खाते सक्रीय ठेवण्यासाठी आणि ते रेग्यूलर सेव्हिंग खात्यामध्ये बदलून घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

पोस्ट ऑफिस देते या सुविधा

पोस्ट ऑफिस ग्राहकांच्या सुविधेसाठी बचत खात्याबरोबरत रेकरिंग डिपॉझिट (RD), पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी अकाउंट (SSA) या सेवा देखील देते

करू शकता डिजिटल पेमेंट

जर तुम्ही या स्कीम किंवा पोस्टाच्या अन्य कोणत्याही स्कीम घेत असाल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मदतीने डिजिटल पेमेंटही करू शकता. याशिवा दुसऱ्या बँक खात्यांमध्ये देखील पैसे ट्रान्सफर करता येतील .

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 13, 2021, 9:13 AM IST

ताज्या बातम्या