मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दीड लाखांचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापलं; नागपूरातील गरीब कुटुंब अंधारात

दीड लाखांचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापलं; नागपूरातील गरीब कुटुंब अंधारात

नागपूर महावितरणाने (Nagpur MSEDCL) एका कुटुंबाला तब्बल 1 लाख 43 हजार 300 रुपयांचं वीजबिल पाठवलं आहे. या घटनेमुळे नागपूर महावितरणाचा ओंगळ कारभार समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 12 फेब्रुवारी: लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबीयांना महावितरणाने वाढीव वीजबिलं पाठवली आहेत. अशातचं नागपूर महावितरणाने (Nagpur MSEDCL) एका कुटुंबाला तब्बल 1 लाख 43 हजार 300 रुपयांचं वीजबिल पाठवलं आहे. या घटनेमुळे नागपूर महावितरणाचा ओंगळ कारभार समोर आला आहे. लॉकडाऊच्या काळात राज्यसरकारने वीजबिल कमी करण्याचं आश्वासन दिलं असताना नागपूर महावितरणाने नागपूरमधील अब्दुल अल्ताफ यांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 61 हजारांच वाढीव बिल पाठवलं होतं. तेव्हापासून त्यांचं बील थकीत राहिलं होतं. महावितरण प्रशासन एवढ्यावरचं थांबलं नाही, तर त्यांचं वीज कनेक्शनही खंडित केलं आहे. त्यामुळे त्यांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.

याव्यतिरिक्त नागपूरच्या जयताळा भागात राहणाऱ्या अश्फाक शेख यांची तर कहाणी आणखी वेगळी आहे. अश्फाक हे एका मटणाच्या दुकानात काम करतात. जयताळा परिसरात त्यांचं दोन खोल्यांचं घर आहे. महावितरणाने त्यांना 59 हजार 450  रुपयांचं बिल पाठवलं आहे. महावितरणाच्या या गैरकारभारामुळे या कुटुंबाने धसकाच घेतला. आता सोमवारी महावितरणाने त्यांचा वीज मीटर काढून नेला आहे. त्यामुळे अश्फाक यांच्या कुटुंबीयांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. आता अश्फाक शेख यांनी राज्य सरकारला मदतीसाठी साकडं घातलं आहे.

हे ही वाचा-'बेळगावला शक्य, मग महाराष्ट्राला का नाही?' कोल्हापूरकरांचा ठाकरे सरकारला सवाल

यांच्या घरी हजारों रुपयांचे वीज बीलं पाठवली आहेत. त्यांच्या घरात इलेक्ट्रीन उपकरणं बोटावर मोजण्या इतकीच आहेत. त्यामुळे एवढं भरभक्कम बिल आलं कसं हा प्रश्न त्यांना देखील पडला आहे. महावितरणाच्या या हलगर्जीपणामुळे संबंधित कुटुंबातील वयोवृद्धांना आणि विद्यार्थांना याचा फटका बसत आहे. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी घरात सुविधा नसल्याने संबंधित कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.

First published:

Tags: Maharashtra, Nagpur