Home /News /money /

7th pay commission: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनर्ससाठी खूशखबर! या दिवशी मिळेल DA चं गिफ्ट

7th pay commission: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनर्ससाठी खूशखबर! या दिवशी मिळेल DA चं गिफ्ट

7th pay commission: महागाई भत्ता (DA) वाढण्याची प्रतीक्षा जवळपास 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनर्सना आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून गिफ्ट मिळू शकतं.

    नवी दिल्ली, 11 जून: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Govt Employee) महत्त्वाची बातमी आहे. महागाई भत्ता (DA) वाढण्याची प्रतीक्षा जवळपास 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनर्सना आहे. या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना लवकरच सरकारकडून गिफ्ट मिळू शकतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए आणि पेन्शनर्सना डिअरनेस रिलीफ (DR) या प्रकरणी नॅशनल काउंसिल ऑफ JCM (National Council of JCM) ची 26 जून रोजी बैठक होणार आहे. नॅशनल काउंसिल ऑफ JCM ही केंद्रीय कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्त्व करणारी बॉडी आहे. या बैठकीची माहिती  नॅशनल काउंसिल ऑफ JCM कडून देण्यात आली आहे. कॅबिनेट सेक्रेटरी या बैठकीचे अध्यक्ष असतील. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा The National Council (JCM) च्या मते, 26 जून रोज अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) आणि जेसीएमच्या प्रतिनिधींमध्ये ही अधिकृत बैठक होईल. सूत्रांच्या माहितीनुसार या परिषदेचे अध्यक्ष कॅबिनेट सेक्रेटरी असतील. बैठकीच्या अजेंडाबाबत जेसीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की, बैठकीत केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांच्या आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांच्या सातव्या सीपीसी डीए आणि सातव्या सीपीसी डीआर लाभांबाबत (7th pay commission) चर्चा होईल. यापूर्वी ही बैठक 8 मे रोजी होणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली. हे वाचा-ग्राहकांना झटका! दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढणं महागणार,RBI वाढवलं हे शुल्क हप्त्यांमध्ये दिला जाऊ शकतो DA या बैठकीनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जेसीएमने कॅबिनेट सचिव कार्यालय, खर्च विभाग आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागाला असा प्रस्ताव दिला आहे की, जर केंद्र सरकार एकाच वेळी डीए आणि डीआरची थकबाकी चुकवण्यास असमर्थ असेल तर ते हप्त्या-हप्त्यात याचे पेमेंट करू शकतात. हे वाचा-DA मिळाल्यानंतर तुमच्या पगारावर कसा होणार फिटमेंट फॅक्टरचा परिणाम, वाचा सविस्तर 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचारी आणि केंद्रीय पेन्शनधारकांच्या खात्यात महागाई भत्ता ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे.  मात्र डीआर आणि डीए संदर्भात अद्याप कोणतही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. 4 टक्के होऊ शकते वाढ 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए प्रदान केला जाऊ सकतो. अनुराग ठाकूर यांनी गेल्या महिन्यात राज्यसभेत यासंदर्भात माहिती दिली होती. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (All India Consumer Price Index AICPI) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून 2121 दरम्यान किमान 4 टक्के डीए वाढवता येऊ शकतो. डीए पुनर्संचयित झाल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 17 टक्क्यांहून 28 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. जानेवारी ते जून 2020 या कालावधीत डीएमध्ये 3 टक्के, जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत 4 टक्के आणि जानेवारी ते जून 2021 पर्यंत 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Dearness allowance, Money

    पुढील बातम्या