मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Zomato IPO: आजपासून आहे मालामाल होण्याची संधी, वाचा काय आहे या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया

Zomato IPO: आजपासून आहे मालामाल होण्याची संधी, वाचा काय आहे या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया

zomato

zomato

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने आजपासून इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) अर्थात आयपीओ (IPO) गुंतवणुकीसाठी खुले केले आहेत. याकरता तुम्ही 16 जुलैपर्यंत अर्ज करू शकता

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 14 जुलै: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने आजपासून इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering) अर्थात आयपीओ (IPO) गुंतवणुकीसाठी खुले केले आहेत.  या आयपीओच्या माध्यमातून 9375 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची कंपनीची योजना आहे. याकरता तुम्ही 16 जुलैपर्यंत अर्ज करू शकता. तुम्हाला देखील या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल (how to buy zomato ipo) तर जाणून घ्या काय आहे याकरताची सर्वात सोपी प्रक्रिया..

या प्लॅटफॉर्मवरून करता येईल गुंतवणूक

तुम्हाला जर झोमॅटोचा आयपीओ खरेदी करायचा असेल तर तुम्ही Upstox, Zerodha यासारख्या दुसऱ्या ब्रोकिंग फर्म च्या माध्यमातून आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवायही काही पर्याय उपलब्ध आहेत.

Upstox च्या माध्यमातून कशाप्रकारे कराल गुंतवणूक?

-Upstox च्या अॅपच्या माध्यमातून किंवा वेबसाइटवरुन तुम्हाला तुमच्या क्रेडेंशिअलसह लॉग इन करावं लागेल

-याठिकाणी तुम्हाला ज्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची आहे तो निवडा

-प्राइस बँड अंतर्गत जास्तीत जास्त तीन बिड अॅड करा

-त्यानंतर तुमचं अॅप्लिकेशन कन्फर्म करा

-UPI मँडेट एक्सेप्ट करा आणि तुमच्या मोबाइल यूपीआय अॅपवर फंड ब्लॉक करा

Paytm Money च्या माध्यमातून करा गुंतवणूक

डिजिटल ब्रोकरेज प्लॅटफॉर्म Paytm Money देखील आता यूजर्नसा मार्केटमध्ये आयपीओ उघडण्याआधी अप्लाय करण्याचा पर्याय देत आहे. Zomato चा आयपीओ या फीचरसह Paytm Money वर लाँच होणारा पहिला आयपीओ आहे आणि गेल्या दोन दिवसात प्लॅटफॉर्मवर हजारो ऑर्डर्स आल्या आहेत.

Zerodha च्या माध्यमातून करा गुंतवणूक

-सर्वात आधी मोबाइल अॅपमधून लॉग इन करा आणि कन्सोलअंतर्गत आयपीओ पर्याय निवडा

-याठिकाणी तुम्हाला ज्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची आहे तो निवडा

-BHIM App मधून तुमचा UPI ID प्रविष्ट करा

-तुमच्या अॅप्लिकेशनसाठी  इन्व्हेस्टर टाइप सिलेक्ट करा आणि कंपनीकडून घोषित लॉट साइझ एंटर करा

-शेअर अलॉटमेंटसाठी कटऑफ प्राइस टिक करा

-कन्फर्म करून सबमिट करा, तुमच्या BHIM UPI App सह मँडेट रिक्वेस्ट एक्सेप्ट करा

हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी, 100 रुपयांनी वधारलं सोनं

गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये 14040 रुपयांची गुंतवणूक करावी लागे, ज्या बदल्यात तुम्हाला कंपनीचे 195 शेअर्स मिळतील. या आयपीओच्या माध्यमातून 9375 कोटी रुपयांचा फंड उभारण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी 9000 रुपयांचे फ्रेश इश्यू जारी करेल तर 375 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील. हा आयपीओ महत्त्वाचा आहे कारण एसबीआय कार्डनंतर झोमॅटोचा हा सर्वात मोठा आयपीओ असेल. गेल्यावर्षी एसबीआय कार्डने आणलेला आयपीओ 10,355 कोटी रुपयांचा होता. गेल्या चार वर्षातील हा दुसरा मोठा आयपीओ ठरणार आहे.

First published:

Tags: Investment, Money, Zomato