म्हातारपणीचा आधार ठरतील मोदी सरकारच्या या योजना, कमी गुंतवणुकीतून मिळवा चांगला रिटर्न

केंद्र सरकारच्या विविध योजना तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित आहेत. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकता.

केंद्र सरकारच्या विविध योजना तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित आहेत. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 26 डिसेंबर: प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याविषयी चिंता असते. एक सुरक्षित भविष्य असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, त्याकरता आर्थिक बाजू भक्कम असणं देखील गरजेचं आहे. मात्र कमी उत्पन्न तसंच खाजगी नोकरी करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना विचार करावा लागतो. अशावेळी केंद्र सरकारच्या विविध योजना तुम्हाला उपयोगी पडतील, ज्यामध्ये गुंतवणूक जरी कमी असली तरी चांगला रिटर्न मिळवता येतो. त्यामुळे तुम्हाला म्हातारपणाची चिंता राहणार नाही. अटल पेन्शन योजना (APY Atal Pension Yojana) यापैकी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेव्यतिरिक्तही काही योजना आहेत, ज्यांचा तुम्ही भविष्य सुरक्षित करण्यासाठी फायदा घेऊ शकता. अटल पेन्शन योजना- अटल पेन्शन योजना केंद्र सरकारची एक सोशल सिक्योरिटी स्कीम आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार असंगठित क्षेत्रांमध्ये (Unorganized Sector) काम करणाऱ्या लोकांना 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देते. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती अटल पेन्शन योजना खाते (APY Account) उघडू शकते. या सरकारी योजनेतील विशेष बाब म्हणजे तुम्ही जितक्या लवकर गंतवणूक कराल तेवढा जास्त फंड तुम्हाला मिळेल. (हे वाचा-महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना RBI ने केला रद्द, ठेवीदारांवर काय होणार परिणाम?) PM शेतकरी मानधन योजना- या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षापासून कमीतकमी 3000 रुपये पेन्शन दिलं जातं. पीएम शेतकरी मानधन योजनेमध्ये जितका प्रीमियम शेतकरी भरतात तेवढाच सरकारकडून देखील शेतकऱ्याच्या या योजनेतील खात्यात जमा केला जातो. या योजनेमध्ये जर एखादा शेतकरी वयाच्या 18 व्या वर्षापासून जोडला गेला तर त्याला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. वयाच्या 30 आणि 40 व्या वर्षी शेतकऱ्याने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली तर त्याला अनुक्रमे 110 आणि 200 रुपये भरावे लागतील. ज्या शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. (हे वाचा-IRCTC तिकिट बुकिंग प्रणालीत होणार बदल, प्रक्रिया जलद करण्याचा रेल्वेचा मानस) PM श्रमयोगी मानधन योजना- असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना वयाच्या साठाव्या वर्षापासून मासिक 3000 रुपये पेन्शन मिळते. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षापासून या योजनेशी जोडली गेली तर तिला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, तर 40 व्या वर्षी जोडली गेली तर 200 रुपये दरमहा जमा करावे लागतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: