नवी दिल्ली, 27 जुलै: देशातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड (Aadhaar Card) असणं अनिवार्य आहे. आधार कार्ड हा अतिशय महत्त्वाचा सरकारमान्य ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्डवर व्यक्तीची बायोमेट्रिक (Biometric Information) माहिती डिजिटल स्वरुपात साठवली जाते. त्यात डोळ्यांच्या बाहुल्यांचं स्कॅनिंग आणि हाताच्या बोटांचे ठसे (Finger Prints) यांचा समावेश असतो त्यामुळे व्यक्तीची अचूक ओळख पटवणे शक्य होतं. लहान मुलांसाठीदेखील अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र असून, अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड बनवण्याची सोय आहे. नवजात बालक ते 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे आधार कार्ड बनवताना त्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. त्याऐवजी त्यांच्या आई-वडिलांचे फिंगर प्रिंटस वापरले जातात. पाच वर्षानंतर मुलांच्या आधारकार्डवरील बायोमेट्रिक माहिती अपडेट केली जाते. हे वाचा- HDFC देत आहे 10 लाख रुपयांची कॅश, द्यावं लागेल 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट अलीकडेच लहान मुलांच्या आधारबाबत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (यूआयडीएआय-UIDAI) 5 वर्षानंतर मुलांची बायोमेट्रिक माहिती अपडेट करणं अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे. सोमवारी ट्वीट करून यूआयडीएआयनं(UIDAI) ही माहिती दिली आहे.
#AadhaarChildEnrolment
— Aadhaar (@UIDAI) July 26, 2021
In #Aadhaar, fingerprints and iris scans are not captured while enrolling the children below 5 years of age, only a photograph is taken. Once the child attains the age of 5, biometrics need to be updated mandatorily. #AadhaarEnrolment #BiometricUpdate pic.twitter.com/Fn6mHSW1Ui
लहान मुलांचे आधार कार्ड बनवायचे असेल तर ते घरबसल्याही करता येते. यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. - यासाठी प्रथम आपल्याला यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. या वेबसाइटवर आधार कार्ड रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल. - मुलाचं नाव, आई-वडिलांचं नाव इत्यादी आवश्यक माहिती तसंच आधार नोंदणी अर्जही भरावा लागेल. - निवासी पत्ता, जिल्हा, शहर, राज्य इत्यादी माहिती भरावी लागेल. - नंतर अपॉइंटमेंट बटणावर क्लिक करा आणि आधार कार्ड रजिस्ट्रेशनसाठीची सोयीची वेळ निवडा. तुम्ही तुमच्या घराजवळील आधार नोंदणी केंद्र निवडू शकता. हे वाचा- 6 महिन्यांपूर्वी सर्वात श्रीमंताच्या यादीत असलेला तो आज अब्जाधीशही नाही कारण… - अपॉइंटमेंट असलेल्या तारखेला मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पालकांच्या आधार कार्डाची प्रत आणि रेफरन्स नंबर घेऊन या केंद्रावर जावे लागेल. - इथं सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल आणि 5 वर्षांखालील मुलाचा फोटो घेतला जाईल. त्यानंतर पालकांची बायोमेट्रिक माहिती मुलाच्या आधार कार्डशी जोडली जाईल. - सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक नंबर दिला जाईल, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. - 60 दिवसांनंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक एसएमएस येईल आणि अर्ज केल्यापासून 90 दिवसांच्या आत तुमच्या मुलाचे आधार कार्ड घरपोच पाठवले जाईल. 5 वर्ष झाल्यानंतर मुलाची बायोमेट्रिक माहिती अपडेट करून त्याचे नूतनीकृत आधारकार्ड घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचे आधार कार्ड उपयोगी ठरणार नाही.