मराठी बातम्या /बातम्या /मनी /6 महिन्यांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत होता; आता अब्जाधीशही राहिला नाही कारण...

6 महिन्यांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत होता; आता अब्जाधीशही राहिला नाही कारण...

फक्त एका निर्णयामुळे ही व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाली आहे.

फक्त एका निर्णयामुळे ही व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाली आहे.

फक्त एका निर्णयामुळे ही व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून बाहेर झाली आहे.

बीजिंग, 27 जुलै: वेळेचं चक्र कधी फिरेल हे कुणीच सांगू शकत नाही, असं म्हणतात ना. याचाच प्रत्यय आला तो जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत (World's richest people) असलेल्या एका व्यक्तीला. 6 महिन्यांपूर्वी ज्या व्यक्तीचा जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत असलेल्या लोकांमध्ये  (World's richest person) समावेश होता. ती व्यक्ती आज अब्जाधीश राहिला नाही. सरकारच्या एका निर्णयाने या व्यक्तीचा रिच पीपलच्या लिस्टमधून पायउतार झाले आहेत.

चीनमधील (China) लॅरी चेन (Larry Chen) एक माजी शिक्षक. गाओटू टेकएज्युचे (Gaotu Techedu Inc) संस्थापक आणि मुख्य कार्यकरी अधिकारी आहे. सहा महिन्यांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत होते. पण आता त्यांनी अब्जाधीश असल्याचाही दर्जा गमावला आहे. त्यांची एकूण संपत्ती आता फक्त 336 दशलक्ष डॉलर्स इतकीच आहे आणि याचं कारण म्हणजे  चीनने खासगी शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार शुक्रवारी न्यूयॉर्क ट्रेडिंगमध्ये त्यांच्या ऑनलाइन-ट्युटरिंग फर्मच्या शेअर्समध्ये जवळपास दोन-तृतीयांश घसरण पाहायला मिळाली. जानेवारी अखेरपासून गाओटूचया स्टॉकमध्ये घसरण झाल्यानंतर आतापर्यंत 15 बिलिअन डॉलर्सपेक्षा जास्त फटका बसला आहे.

हे वाचा - Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती

शनिवारी चीनने शिक्षणाबाबत नवे नियम जारी केले. ज्याचा मोठा फटका चेन यांना बसला. चेन यांनी शनिवारी चिनी सोशल मीडिया वीबोवर सांगितलं की, गाओटू नियमांचं पालन करेल आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करेल. चेन यांनी 2014 गाओटूची स्थापना केली होती. याला सुरुवातीला जीएसएक्स म्हटलं जायचं.

खासगी ट्युटरिंग आणि ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात चीनने आतापर्यंत सर्वात कठोर प्रतिबंध लागू केले आहेत. यामुळे  टाइगर ग्लोबल मॅनेजमेंटपासून टेमासेक होल्डिंग्स पीटीईपर्यंत सर्वांवरच परिणाम झाला आहे.

हे वाचा - ग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट

या नियमानंतर संपत्ती घटणारे चेन एकमेव नाहीत. न्यूयॉर्कमध्ये कंपनीचे शेअर 71% घसरल्यानंतर  टीएएल एज्युकेशन ग्रुपचे सीईओ झांग बँग्सिन यांची संपत्ती 2.5 बिलियन डॉलरवरून 1.4 बिलियन डॉलरवर आली आहे. न्यू ओरिएंटल एजुकेशन अँड टेक्नोलॉजी ग्रुप इंकचे चेअरमन यू मिनहोंगसुद्धा अब्जाधीश राहिले नाहीत. दोन्ही कंपन्यांनी नियमांचं पालन करण्याचं ठरवलं आहे.

First published:

Tags: China, Lifestyle, Money, Rich World, World news