फक्त 1.30 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 5.5 लाख रुपये

फक्त 1.30 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 5.5 लाख रुपये

Fruit Bar Business,khadi village industries commission - तुम्हाला घरबसल्या काही सोपं आणि मागणी असलेलं काम करायचं असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो खास व्यवसायाबद्दल

  • Share this:

मुंबई, 22 जून : तुम्हाला घरबसल्या काही सोपं आणि मागणी असलेलं काम करायचं असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो खास व्यवसायाबद्दल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करेल. हा व्यवसाय आहे फ्रूट बारचा. यासाठी पंतप्रधान  एम्प्लाॅयमेंट जनरेशन प्रोग्रॅम अंतर्गत 90 टक्के कर्ज मिळू शकतं. शिवाय 15 ते 25 टक्के सबसिडी मिळते.

सरकारी एजन्सी खादी व्हिलेज इंडस्ट्री कमिशन ( KVIC )नं तयार केलेल्या या प्रोजेक्टप्रमाणे हा व्यवसाय 12.82 लाख रुपयात सुरू होऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळजवळ 11.55 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जवळजवळ 1.28 लाख रुपये हवेत.

मोदी सरकारची खास योजना, देतात मोफत ट्रेनिंग आणि 8 हजार रुपये

फ्रूट बार म्हणजे काय?

फळं वेगवेगळ्या सिझनमध्ये उपलब्ध होतात. देशात फळांचं प्रीझर्व्हेशन वेगवेगळ्या प्रकारे होतं. त्यात एक आहे फ्रूट बार. केळं, आंबा, सफरचंद यांचा फ्रूट बार बनवणं सोपं असतं. तुम्हीही फ्रूट बार युनिट सुरू करून व्यवसाय सुरू करू शकता.

RRB recruitment 2019 : 10वी उत्तीर्ण झालेल्यांना संधी, 992 पदांवर भरती

या व्यवसायासाठी हव्यात या गोष्टी

पहिल्यांदा कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. तुम्ही 60 टन फ्रूट बार तयार करण्यासाठी प्रोजेक्ट तयार करू शकता. त्यासाठी 100 स्क्वेअर फीट जमीन हवी. इथे वर्क शेड तयार होईल. याशिवाय तुम्हाला जवळजवळ 4.32 लाख रुपयांच्या इक्विपमेंट्सची गरज लागेल. तुम्ही वर्क शेड भाड्यानं घेतली तर 2.50 लाख रुपयांचा खर्च होईल. म्हणजे तुम्हाला 6.28 लाख रुपयांचं भांडवल तयार ठेवावं लागेल.

प्रवासाचा वेळ कामाच्या तासात मोजला जावा, कर्मचाऱ्यांची मागणी

या साधनांची गरज

फ्रूट वाॅशिंग टब, पल्प एक्सट्रेक्टर्स, स्टीम केतली, बेबी बाॅयलर, फ्रूट मिल, ट्रे ड्रायर, वजनाचं मशीन, टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट यांची गरज आहे.

किती हवं वर्किंग कॅपिटल?

कच्चा माल : 17.60 लाख रुपये

लेबल पॅकेजिंग :  2 लाख रुपये

पगार : 11 लाख रुपये

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च: 1.5 लाख रुपये

ओव्हरहेड खर्च: 2 लाख रुपये

इतर खर्च: 1.25 लाख रुपये

डेप्रिसिएशन : 55 हजार रुपये

इन्शुरन्स आणि व्याज: 1.73 लाख रुपये

एकूण वर्किंग कॅपिटल :  37 लाख रुपये

या अहवालानुसार तुमची वर्षभराची विक्री 43 लाख रुपये होईल. तुमचा खर्च 37 लाख 36 हजार रुपये येईल. म्हणजे वर्षभरात तुम्ही 5.63 लाख रुपये कमाई करू शकता.

इथे करा अर्ज

या योजनेअंतर्गत कर्ज हवं असेल तर

https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp इथे अर्ज करा.

पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 01:14 PM IST

ताज्या बातम्या